नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ५ जानेवारी रोजी ते काही वैयक्तिक कामानिमित्त साताऱ्याहून पुण्यात आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते स्वारगेट एसटी स्थानक परिसरात बसमधून उतरले आणि पायी चालत जात होते. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत सोन्याचे मौल्यवान दागिने होते.
advertisement
पिशवी तपासली अन् धक्का बसला: स्वारगेट परिसरातून जात असताना, काही वेळानंतर त्यांनी आपली पिशवी तपासली असता त्यांना मोठा धक्का बसला. पिशवीची चैन उघडून त्यातील सोन्याचे दागिने गायब झाले होते. चोरट्यांनी अतिशय शिताफीने गर्दीमध्ये या ज्येष्ठ नागरिकाला लक्ष्य केले आणि दागिन्यांची चोरी केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ३ लाख ४१ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या चोरीप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. स्वारगेट परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते, त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
