वेगमर्यादेत मोठा बदल
पुणे-मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. भुमकर ब्रिज ते नवले ब्रिजच्या शेवटपर्यंत (कात्रज बायपास मार्ग) या संपूर्ण पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ नवले पुलाच्या तीव्र उतारावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. मात्र आता भुमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत संपूर्ण मार्गासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
advertisement
पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: 11 दिवस वेळापत्रक विस्कळीत, तपासा नव्या वेळा
नवले पुलावर तीव्र उतार असल्याने अनेकदा वाहनचालक गाडी न्यूट्रल करून वेगावर नियंत्रण गमावतात. हे टाळण्यासाठी वाहतूक विभागाने वाहनचालकांना या नव्या वेगमर्यादेचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पीड गनच्या मदतीने लक्ष ठेवले जाईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या नव्या नियमामुळे अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. मात्र, आता इतकी कमी वेगमर्यादा निश्चित केल्याने वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सातत्याने अपघात
पुण्यातील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होतात. 13 नोव्हेंबरला नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर आणि कारला आग लागली आणि आठ जणांना जीव गमवावा लागला
