जेधे चौक ते सारसबाग भुयारी मार्ग शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री 11 वाजल्यापासून पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सातपर्यंत सुरू राहणार असून, तोपर्यंत या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सांस्कृतिक पुण्यातले 'बक्कासूर', मिसुरडं न फुटलेली पोरं अन् कोयते! SPECIAL REPORT
advertisement
जेधे चौकातील भुयारी मार्गात पाणीगळती
गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट परिसरातील केशवराव जेधे चौकातील भुयारी मार्गातून काही दिवसांपासून पाणी गळत असून, त्यामुळे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून मार्गाच्या भिंतींमधून होत असलेली गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. पुढील तीन दिवसांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरू असताना या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
शंकरशेठ रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांना सध्या भुयारी मार्ग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या वाहनांनी डाव्या बाजूच्या मार्गाने जेधे चौकात यावे आणि तेथून सारसबागेकडे वळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.






