Sharad Pawar : पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारावर आजोबा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'चौकशी करून त्याला...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sharad Pawar on Parth Pawar Land Deal : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा हा एक गंभीर विषय आहे. चौकशी करून सत्य समाजासमोर ठेवलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत.
Pune Mundhawa Parth Pawar Land Deal : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार हे संचालक असलेल्या Amadea Holdings LLP नावाच्या कंपनीने, 1804 कोटीची महार वतनाची जमीन 300 कोटींना विकत घेतली अन् त्यावरील 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्यात आली. या गैरव्यवहारानंतर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. अशातच आता आजोबा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरुद्ध राजकीय एल्गार केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा हा एक गंभीर विषय आहे. चौकशी करून सत्य समाजासमोर ठेवलं पाहिजे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य होतं. सुप्रियाला तिचं स्वत:चं मत असू शकतं. तिने खूप सौम्य भूमिका मांडली होती. सरकारने समिती स्थापन केली आहे. प्रशासकीय गोष्टी वेगळ्या आणि कौटुंबिक गोष्टी वेगळ्या, असं शरद पवार म्हणाले आहे.
advertisement
पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही?
कुटूंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोण तेजवानी याबद्दल मला माहिती देखील नाही पण त्यांना शोधून काढावं, असंही शरद पवार म्हणाले. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही, याबाबत देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील, असंही शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी शरद पवार यांनी मनसेसोबतच्या युतीवर देखील भाष्य केलं.
advertisement
मनसे संदर्भात माविआने एकत्र बसून निर्णय घ्यावा - शरद पवार
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील केलं जाणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारल्यानंतर उत्तर दिलं. मनसे संदर्भात माविआने एकत्र बसून निर्णय घ्यावा, असं मत देखील शरद पवार यांनी मांडलं आहे. मनसे आणि माविआने मतचोरीविरुद्ध मुंबईमध्ये भव्य रॅली काढली होती.
advertisement
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
माझा पार्थवर विश्वास असून तो चुकीची गोष्ट करणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, मी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. रकार म्हणत आमची जमीन विकता येत नाही. तहसीलदार म्हणतात मी सही केली नाही. त्यामुळे नोंदणी झाली की नाही? नेमकं सरकार कोण चालवतं? आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवतो. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या. त्यांची पहिली टर्म चांगली होती, अच्छे को अच्छा बोलना चाहिए, पण आता मुख्यमंत्र्यांना झालंय काय? इतका गोंधळ का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 1:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sharad Pawar : पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहारावर आजोबा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'चौकशी करून त्याला...'


