खडकवासला मुठा-उजवा कालव्याच्या परिसरात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत.
Weather Alert: अवकाळी संकटानंतर धोका वाढला, महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 48 तासांसाठी अलर्ट
पाणीपुरवठा काळात जमावबंदी लागू
उन्हाळा सुरू झाल्यानंतर या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी इतर कालवे तसेच नद्यांमधून पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाते. मात्र, पाणी सोडल्यानंतर त्याच्या वाटपावरून अनेक ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
advertisement
या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी सोडण्याच्या सुरुवातीपासून ते पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालव्यालगत 100 मीटर परिसरात जमावबंदी
शेटफळगडे, अकोले, पारवडी, निरगुडे, कळस, लोणी देवकर, रावणगाव, नंदादेवी, मळद, शिर्सूफळ, गिरीम, गोपाळवाडी, माळवडी, मेरगळवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूंना 100 मीटर अंतरापर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा आदेश कालव्याच्या संपूर्ण परिसरात लागू राहणार आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, या काळात कालव्याच्या परिसरात अनावश्यक गर्दी किंवा जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






