TRENDING:

अरे आवरा यांना! पैसे दागिने झाले, आता कपडेही सोडेना; पुण्यातील महिलेनं केली अजब चोरी, पोलीसही चक्रावले

Last Updated:

चालकाने आपला टेम्पो येरवड्यातील प्रतीकनगर परिसरात उभा केला असताना संधी साधून नंदा काळे हिने टेम्पोतील पार्सल चोरून नेले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यात काहीही घडू शकतं, असं म्हणतात आणि ते बहुतेकदा खरंही ठरतं. आता नुकतीच पुण्यातून आणखी एक अजब घटना समोर आली आहे. ही घटना आहे एका अजब चोरीची. पैशांच्या किंवा दागिन्यांच्या चोरीच्या अनेक घटना आपण रोज ऐकतो. मात्र, कपड्यांच्या चोरीच्या घटना अगदी कमीच ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. आता शहरातील येरवडा परिसरात महागडे कपड्यांचे पार्सल घेऊन जाणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही ४५ वर्षीय महिला टेम्पोतून कपडे चोरी करायची.
महिलेची अजब चोरी (प्रतिकात्मक फोटो)
महिलेची अजब चोरी (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

रस्त्याच्या कडेला लावलेल्या टेम्पोतून माल लंपास करून पसार झालेल्या या महिलेला येरवडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोधून काढलं. नंदा विकास काळे (वय ४५, रा. चंद्रमानगर, येरवडा) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार टेम्पो चालक हे ऑनलाइन विक्रीसाठीच्या विविध वस्तूंची वाहतूक करतात. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे महागड्या कपड्यांचे पार्सल पोहोचवण्याचे काम सोपवण्यात आले होते. चालकाने आपला टेम्पो येरवड्यातील प्रतीकनगर परिसरात उभा केला असताना संधी साधून नंदा काळे हिने टेम्पोतील पार्सल चोरून नेले.

advertisement

ते आले, सिगरेट घेतली अन् कोयता काढून...पुण्यातील पान टपरीवरील घटनेचा थरकाप उडवणारा Video

चोरीची तक्रार येताच, पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे आणि शैलेश वाबळे यांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये चोरी करणारी महिला स्पष्टपणे कैद झाली होती. ही महिला परिसरातच राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि तिला ताब्यात घेतलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तिच्याकडून चोरलेला माल हस्तगत केला आहे. यासोबतच तिने अशा आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
अरे आवरा यांना! पैसे दागिने झाले, आता कपडेही सोडेना; पुण्यातील महिलेनं केली अजब चोरी, पोलीसही चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल