त्या म्हणाल्या, की हे दोघे अटकेत आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आणि पोलिसांची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे, असं मला वाटतं. अजय तावरेकडून फक्त रक्ताचे सॅम्पल बदलल्याप्रकरणी नाही, तर गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं? हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
advertisement
तावरेचा आणि राज्यातील सत्तापालटाचा संबंध...; सुषमा अंधारेचा महाजनांवर निशाणा
पुण्यात त्या बोलत होत्या. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी खुलासे 4 जूननंतर करणार असल्याचा इशारा सुषमा अंधारेंनी दिला आहे. 4 जूनला निकाल आहे, पोलिसांच काम मला वाढवायचं नाही. त्यामुळे 4 जूननंतर खुलासा करणार असल्याचं त्या म्हणाल्या. डॉक्टर अजय तावरे आणि राज्यात २ वर्षांपूर्वी सत्तापालट झालं त्याचा काय संबंध आहे का हे गिरीश महाजन यांना विचारा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मंत्री गिरीश महाजनांवरही निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, आर्यन खान आणि सिंघनिया प्रकरणात पुढं काय झालं काय सुनावणी झाली हे पुढं आलं नाही. गोसावी आणि प्रभाकर साहिलचं पुढं काय झालं? प्रभाकर हा मुख्य पुरवा होता पण त्याचा मृत्यू झाला. ललित पाटीलने देखील मला फसवलं गेलं अस सांगितलं होतं. माझ्याकडे नावं आहेत, पुढं त्याचं काय झालं हे पुढं आलं नाही. आता या प्रकरणी देखील पुरावे मिटवले जात आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.