तावरेचा आणि राज्यातील सत्तापालटाचा संबंध...; सुषमा अंधारेचा महाजनांवर निशाणा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
डॉक्टर अजय तावरे आणि राज्यात २ वर्षांपूर्वी सत्तापालट झालं त्याचा काय संबंध आहे का हे गिरीश महाजन यांना विचारा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधला.
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी दोन डॉक्टरना अटक करण्यात आलीय. यातील डॉक्टर अजय तावरे याच्यावर याआधीही अनेक आरोप झाले आहेत. मात्र याच डॉक्टरसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक आरोप केले आहेत. तसंच ज्या डॉक्टरांना अटक झालीय त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
डॉक्टर अजय तावरे आणि राज्यात २ वर्षांपूर्वी सत्तापालट झालं त्याचा काय संबंध आहे का हे गिरीश महाजन यांना विचारा असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर निशाणा साधला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अजय तावरे फक्त ब्लड प्रकरणी नाही तर गेली 10 वर्ष त्याने काय काय बघितलं आहे? मंत्रालयातील 6 व्या मजल्याच्या नेमका काय संबंध आहे. तिथे अनेक मंत्र्याची दालन आहे. त्यावर गिरीश महाजन बोलत नाहीत. सत्ता पालट झालं त्यात अजय तावरेचा संबंध गिरीश महाजन यांना विचारा. मी अनेक नाव घेत आहे. अजय तावरेकडे कुणाची नावं आहेत? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला.
advertisement
सुनील टिंगरे यांनी अजय तावरे यांची शिफारस दिली मग आधी ते खोटे का बोलले? वेदांत अग्रवालला दाखवताना इतर चेहरे ब्लार केले आहेत. मायनर आहेत म्हणून ब्लर केले आहेत की पोलीसांना कुणाला दाखवायचं नाही? ही सगळी गृहखात्याची जबाबदारी आहे. जर गृहखाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि खातं माझ्याकडे द्या असंही सुषमा अंधारे म्हणाले.
advertisement
सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोकसभेचा निकाल 4 जूनला आहे. पोलिसांच काम मला वाढवायचं नाही. अजय तावरे आणि हरनोल यांना अटक झाली आहे, या दोघांची सुरक्षाता महत्वाची आहे. हे दोघे अटकेत आहेत. दोघांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आणि पोलिसांची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे असं मला वाटतं.
आर्यन खान आणि सिंघनिया प्रकरणात पुढं काय झालं काय सुनावणी झाली हे पुढं आलं नाही. गोसावी आणि प्रभाकर साहिलचं पुढं काय झालं? प्रभाकर हा मुख्य पुरवा होता पण त्याचा मृत्यू झाला. ललित पाटीलने देखील मला फसवलं गेलं अस सांगितलं होतं. माझ्याकडे नाव आहेत पुढं त्याच काय झालं हे पुढं आलं नाही. आता या प्रकरणी देखील पुरावे मिटवले जात आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 29, 2024 1:03 PM IST