समुद्रकिनाऱ्यावर 'थार'चा थरार! सुसाट गाडी जागेवर पलटी, पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला, घटना CCTVत कैद!

Last Updated:

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकाने भरधाव वेगाने 'थार' गाडीने स्टंटबाजी केली. वाळूवर गाडीचा ताबा सुटल्याने...

Ratnagiri News
Ratnagiri News
Ratnagiri News : दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा बेफामपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. गुरुवारी (दि. ११) सायंकाळी साडेचारच्या सुमारास समुद्राच्या वाळूवर सुसाट वेगाने गाडी चालवून स्टंटबाजी करणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुणे येथील पर्यटकांची ‘थार’ (क्र. एमएच १२, एक्सटी १७८८) गाडी किनाऱ्यावर वेगाने स्टंट करत असताना हा अपघात झाला. गाडीचा वेग इतका जास्त होता की, ती उलटली आणि त्यातील काहीजण बाहेर फेकले गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी
या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी जेसीबीच्या मदतीने गाडी किनाऱ्यावर सुरक्षित आणली. मात्र, अशा बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दापोली, कर्दे आणि हर्णे येथील किनाऱ्यांवर अनेक पर्यटक येतात. मात्र, काही बेपर्वा पर्यटक सूचना आणि नियमांकडे दुर्लक्ष करून समुद्रात धोकादायक स्टंट करतात, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
advertisement












View this post on Instagram























A post shared by My Kokan (@mykokanhd)



advertisement
स्थानिकांनी अशा स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक नियमांची योग्य व्यवस्था करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
समुद्रकिनाऱ्यावर 'थार'चा थरार! सुसाट गाडी जागेवर पलटी, पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला, घटना CCTVत कैद!
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement