पुणे : महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) ताम्हिणी घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळे एका बाजूने तडा गेल्याने रस्ता खचला आहे. यामुळे नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता 5 ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
advertisement
मुळशी तालुक्यात गेली दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळे रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटामध्ये जागोजागी दरडी ही कोसळल्या आहेत. चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचते. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदचे निर्देश दिले आहेत.
ठाणेकरांनो लक्ष द्या! घोडबंदर रोडवरील वाहतुकीत मोठा बदल, असा असेल नवीन मार्ग
अनेकवेळा अचानक दरडी कोसळत असतात. झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटनाही घडतात. पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. वरंधा घाट आणि ताम्हिणी घाटाने कोकण गाठता येते. वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अनेक वळणे आहेत. त्याऐवजी ताम्हिनी घाट सुरक्षित आहे. यामुळे हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना वरंधा घाट बंद केला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हा रस्ता बंद आहे. त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्यांसाठी दोन्ही रस्ते बंद आहेत. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत.






