TRENDING:

Pune News: रिअल इस्टेटमध्ये पुणे शहरात 10 ते 12 टक्क्यांची वाढ, मुंबईचा क्रमांक कितवा?

Last Updated:

देशातील वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक असलेल्या पुणे शहराने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. व्यावसायिक जागांच्या भाडेवाढीच्या बाबतीत पुणे देशातील टॉप पाच शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
देशातील वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक असलेल्या पुणे शहराने पुन्हा एकदा वेगळ्या कारणाने प्रसिद्धी मिळवली आहे. व्यावसायिक जागांच्या भाडेवाढीच्या बाबतीत पुणे देशातील टॉप पाच शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सीबीआरई (CBRE) मॉनिटरिंग अहवालानुसार, मागील 10 ते 12 महिन्यांमध्ये पुण्यातील व्यावसायिक भाड्यांमध्ये 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली असून, गुंतवणूकदार आणि उद्योजकांसाठी हे शहर अधिक आकर्षक ठरत आहे.
व्यावसायिक जागांच्या भाडेवाढीत पुणे पाचव्या स्थानावर..
व्यावसायिक जागांच्या भाडेवाढीत पुणे पाचव्या स्थानावर..
advertisement

शहरातील हिंजवडी, कोथरूड, बावधन, बाणेर आणि शिवाजीनगर या भागांमध्ये व्यावसायिक मागणी प्रचंड वाढली आहे. हिंजवडी परिसरात आयटी पार्क, स्टार्टअप हब आणि को-वर्किंग स्पेसेसच्या वाढत्या गरजेमुळे मोठ्या प्रमाणावर नवीन ऑफिस प्रोजेक्ट्स उभे राहत आहेत. त्याचबरोबर बावधन आणि बाणेर भागांमध्ये रिहायशी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारचे विकास एकत्रितरीत्या होत असल्याने गुंतवणूकदारांसाठी हे हॉटस्पॉट बनले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञांच्या मते, मुंबई आणि बेंगळुरूनंतर पुणे हे सर्वाधिक पसंतीचे व्यावसायिक केंद्र बनले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

शहरातील पायाभूत सुविधा, मेट्रोसेवा आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्याकडे आकर्षित होत आहेत. पुण्यातील आयटी, सॉफ्टवेअर आणि स्टार्टअप सेक्टरच्या विस्तारामुळे व्यावसायिक जागांची मागणी सातत्याने वाढत आहे. हिंजवडी- बावधन परिसरातील मल्टी- ऑफिस स्पेसेस आणि को- वर्किंग हब्स हे नवीन उद्योजकांचे प्रमुख केंद्र ठरत आहेत. विशेष म्हणजे, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील परिसरांमध्ये विकसित होत असलेल्या व्यावसायिक प्रकल्पांमुळे पुण्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. हिंजवडी आणि बावधन हे दोन्ही भाग आयटी व स्टार्टअप उद्योगांचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत. बाणेर आणि कोथरूड भागांमध्ये राहणीमान व व्यावसायिक विकासाचा समतोल साधला गेला असून, हे भाग गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक वाटतात. शिवाजीनगर परिसरात सरकारी कार्यालये, परंपरागत व्यवसाय केंद्रे तसेच नवीन प्रकल्पांमुळे व्यावसायिक हालचालींना चालना मिळाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News: रिअल इस्टेटमध्ये पुणे शहरात 10 ते 12 टक्क्यांची वाढ, मुंबईचा क्रमांक कितवा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल