गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम
मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वेळी बावऱ्या बैल गौतमीच्या स्टेजच्या समोर बांधला होता आणि त्यापुढे गौतमी नृत्य सादर करत होती. मुळशीतील सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लबने हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. अशातच आता सुशील हगवणेचा या प्रकरणात कार्यक्रम झाल्याचं बघायला मिळतंय.
advertisement
पाहा Video
फोर्च्युनर कार जप्त
वैष्णवीच्या कुटुंबियांकडून त्यांनी हुंडा म्हणून घेतलेली तब्बल 48 लाख रुपये किमतीची फोर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केलीय. व्यतिरिक्त देखील ते पैशाचा नेहमी माज दाखवायचे आणि त्यामुळे ग्रामस्थ देखील त्रस्त होते. एकूणच फुकटच्या पैशावर हागवणे कुटुंबीयांचा माज आता अंगलट आला आहे. पण वैष्णवीच्या दिराचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. याच वैष्णवीच्या दिराने बैलासमोर गौतमीच्या नाच आयोजित केला होता.
51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी अन्...
दरम्यान, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेतला होता.