गोविंद गणेश कोमकर (१८ वर्षे) याचा राहत्या घराच्या परिसरातील पार्किंगमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला. आयुष महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तो क्लासवरून घरी आला, पार्किंगमध्ये होता तेव्हा त्याच्यावर हल्ला झाला, काल (शुक्रवारी) रात्री नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रूग्णालायत दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. घटनेनंतर आरोपी पसार झाले. ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत आणि विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीच्या काळामध्ये झालेल्या या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
आंदेकर-कोमकर संघर्षात नातवाचा बळी
गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आहे. ती वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-कोमकर संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचा बळी गेला. 18 वर्षांचा गोविंद क्लासवरून घरी परतला असताना त्याच्यावर पार्किंगमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. वनराजचे वडील आणि गोविंदचे आजोबा बंडू आंदेकरानी ही हत्या घडवून आणल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो, आणि नातू हा आजोबाचा शेवटचा दोस्त असल्याचं बोललं जातं. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. मात्र इकडे मात्र आजोबा आणि नातवाचं पक्क वैर पाहायला मिळालं
कोण आहे बंडू आंदेकर?
वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकरांची टोळी पुण्यातील जुन्या टोळींपैकी एक आहे. आंदेकर टोळी आणि माळवदकर या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. या टोळीयुद्धातून प्रमोद माळवदकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात बंडू आंदेकर याला जन्मठेप झाली होती. गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज आंदेकरचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झालीय. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सूर्यकांत आंदेकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या असून 1985 पासून अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.