पुणे : गणपतीमध्ये मुख्य आकर्षण हे देखावे असतात. मंडळांप्रमाणे घरीदेखील देखावे तयार केले जातात. यामध्ये वेगवेगळी थीम तयार केली जाते. पुण्यातील संतोष कुंभार हे मागील अनेक वर्षांपासून मातीपासून बनणाऱ्या वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडे जवळपास 8 ते 10 प्रकारच्या थीमवरचे देखावे पाहायला मिळतात. त्यामुळे या वर्षीचा ट्रेंड काय आहे व याचे दर काय आहेत, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
पुण्यातील कुंभार वाडा या ठिकाणी माऊली आर्ट्स हे मागील 25 वर्ष जुने दुकान आहे. ते मिनिएचर वस्तूसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व वस्तू मातीपासून तयार केल्या जातात. आता गणपती साठी काही थीम सेट आहेत. यामध्ये गोंधळी, ढोली बाजा, वासुदेव, नंदीबैल, भजनी, बारा बलुतेदार, उंदीर मामा सेट पाहायला मिळतात.
पुण्यातील या गावाला म्हटलं जातं गौराईचं माहेरघर, नेमकं काय आहे यामागचं कारण?, VIDEO
साधारण प्रत्येक वस्तूचे दर 300 रुपयांपासून सुरू होतात. 300 ते दोन-अडीच हजार रुपयांपर्यंत याठिकाणी हे सेट मिळतात. यामध्ये सात, पाच, तीन असे सेट येतात. हे मातीपासून बनवले जातात. त्याला वरुन कापड लावले जाते. या सर्व वस्तू कोलकातामध्ये बनवल्या जातात. या वर्षी पाहिले तर वारकरी, मावळे या सेटला जास्त मागणी आहे, अशी माहिती व्यावसायिक संतोष कुंभार यांनी दिली.
Ganeshotsav Nashik : नाशिकच्या बाजारात दाखल झाली लाल मातीची मूर्ती, दरही परवडणारे, फायदेही आहेत अनेक
याची किंमतही अगदी कमी असून आहे. त्यामुळे लोकांची याला चांगली मागणी मिळते आहे. तुम्हालाही अशाच सुंदर सेट घ्यायचे असतील तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकतात.