राज्यातील मासिक पाणी तपासणी अहवालानुसार, मे महिन्यात पुण्यातील 22 हजार 821 ठिकाणच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 192 नमुने दूषित आढळले आहेत. याची टक्केवारी 0.8 टक्के इतकी आहे. ग्रामीण भागातील 2812 नमुन्यांपैकी 103 नमुने (3.66 टक्के) दूषित होते, तर शहरी भागातील 20 हजार 9 नमुन्यांपैकी 89 (0.44 टक्के) नमुने दूषित होते.
advertisement
Lokmanya Tilak: हुबेहूब लोकमान्य! टिळकांची 106 वर्षांपूर्वीची जिवंत प्रतिकृती, पुण्यात कुठं पाहाल?
जून महिन्यात ही परिस्थिती आणखी गंभीर झाली. जमा केलेल्या 22 हजार 433 नमुन्यांपैकी 261 (1टक्के) नमुने दूषित असल्याचं आढळलं. यामध्ये ग्रामीण भागातील 3048 नमुन्यांपैकी 149 नमुने (4.89 टक्के ) दूषित, तर शहरी भागातील 19 हजार 385 नमुन्यांपैकी 112 नमुने (0.58%) नमुने दूषित असल्याचं आढळलं. जूनमध्ये जमा केलेल्या पाणी नमुन्यांची संख्या कमी असली तरी दूषित नमुन्यांचे प्रमाण वाढले आहे.
दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मे महिन्यात तीव्र अतिसाराचे 911, आमांशाचे 12, हिपॅटायटिसचे 7 आणि विषमज्वराचे 16 रुग्ण आढळले होते. तर जून महिन्यात तीव्र अतिसाराचे 1226, हिपॅटायटिसचे 12 आणि विषमज्वराचे 17 रुग्ण आढळले होते.
नागरिकांनी दक्षता बाळगावी
नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून किंवा फिल्टर करून घ्यावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. तसेच ग्रामपंचायती आणि महापालिकांनी जलस्रोत स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.