TRENDING:

काळजी घ्या! पुढील 2 दिवस धोक्याचे, विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

Last Updated:

राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यात जोर अधिक आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: राज्यातील बहुतांश भागात पावसाने काहिसा ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आहे. पुढील 2-3 दिवस काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.

advertisement

मुंबईत पुन्हा पावसाचा जोर

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला होता. परिणामी, मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र येत्या 2 दिवसात मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या भागात सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत 30 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

advertisement

View More

शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई हवी? मग 1 नियम माहित असायलाच हवा

पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

पुणे व परिसरात पुढील 3 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. सोमवारी घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात 29 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे.

advertisement

विदर्भातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात मुळसाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, अमरावती, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अकोला, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. नागपूर मध्ये 30 अंश कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

advertisement

चमत्कारच! समुद्र दूर, तरी सांगलीच्या देवस्थानात बारमाही पाणी; लोक म्हणतात 'दक्षिण काशी'

मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिगोली, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या काही दिवसात मराठवाड्यात तुफान पावसाची शक्यता आहे. संभाजीनगर मध्ये 30 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
काळजी घ्या! पुढील 2 दिवस धोक्याचे, विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल