पुण्यामध्ये आज कुठलीही पावसाची शक्यता नाही. त्यामुळे त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तेथील तापमानात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
होळीनिमित्त प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर दरम्यान धावणार विशेष गाड्या
advertisement
साताऱ्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. साताऱ्यात अंशतः ढगाळ आकाश गेले दोन दिवस कायम आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत हलक्या पावसाची शक्यता हवामान वर्तवली आहे. सांगलीमध्ये आज सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सांगलीमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. रविवार आणि सोमावारला सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
सोलापूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये आज रोज रविवारला सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर 24 फेब्रुवारीला देखील ही स्थिती कायम असणार आहे.
कोल्हापूरमध्ये आज सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोल्हापूरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतक असू शकतं. 24 फेब्रुवारीला देखील कोल्हापूरमध्ये हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत आज सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात हवापालट होऊन तेथील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.