पुणे : विघ्नहर्त्या गणरायाबरोबरच गौरी महालक्ष्मीच्या आगमनास अवघे काही दिवस शिल्लक आहे. त्यामुळे गौरीचे मुखवटे आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. परंतु पुण्यात हे गौराईचे मुखवटे नेमके कुठे बनवले जातात, याबाबत अनेकांना माहिती नसेल. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
भोर तालुक्यातील उत्रौली गावात मूर्ती निर्मितीतील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती तसेच आकर्षक सुंबक चैतन्यमय गौराईचे माहेरघर उत्रौली असल्याने येथील गौराईला मागणी सर्वाधिक आहे. येथील मूर्तिकार हजारोंच्या संख्येने गौराई घडविण्याचे काम करीत असतात.
advertisement
उत्रौली आणि पंचक्रोशीत तयार होणाऱ्या मूर्तीना शेगाव, लातूर, बूलडाणा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लालबाग, धुळे, गुजरात, वापी, सुरत, बडोदा, दिल्ली, मद्राससह परदेशात इंग्लंड, अमेरिका येथे गौराईंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या मूर्तिकार दिवस रात्री जागवून मूर्तीचे रंगकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मुर्तीची उंची, शाडुची माती, लाल माती, मुलतानी मातीचा वापरावर भर दिला जातो.
त्यानंतर गौराईच्या सुंदर अशा मुर्ती बनवल्या जातात, असे त्यांनी सांगितले. अतिशय आकर्षक आणि प्रसन्न अशा या मुर्तींचे रुप प्रत्येकाला मोहित करते. या गावातील लोकांचा हा व्यवसाय असून अनेक कुटुंबाची उपजीविका या कामावर अवलंबून आहे.
Ganeshotsav Nashik : नाशिकच्या बाजारात दाखल झाली लाल मातीची मूर्ती, दरही परवडणारे, फायदेही आहेत अनेक
मूर्ती कशी तयार होते -
अगोदर साचा निर्मिती, मुखवटा घडवणे, फिनिशिंग, रंगकाम, दागदागिन्यांची कलाकुसर, डोळे, भुवया, नाक, ओठ यांचे नाजूक काम अशा अनेक टप्प्यांमधून हे मुखवटे आकाराला येतात. सजीव डोळे, धारदार नाक, नाजूक जिवणी आणि सुबक ठेवण हे या मुखवट्यांचं वैशिष्ट्ये आहेत. गौरीचे शाडूचे मुखवटे नाजूक असतात. त्यामुळे ते हळूवारपणे हताळावे लागते.
बैलपोळ्याचा सण, याठिकाणी भरतो जालना जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार, साज खरेदीसाठी मोठी गर्दी, VIDEO
हे गौरी मुखवटे प्लास्टर ऑफ पॅरीसचे तयार केले जातात. एका गौरी मुखवटयाचे वजन 100 ग्रॅमच्या आसपास असते. हे गौरी मुखवटे दरवर्षी विसर्जित केले जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाला फारशी हानी होत नाही, असेही त्यांनी सांगितले.