TRENDING:

पुस्तक हातात घेतलं रे घेतलं की, झोप लागते? कारण आहे गंभीर, आताच लक्ष द्या!

Last Updated:

मल्टीटास्किंग स्वभाव असणं कधीकधी चांगलं असतं, परंतु ते तेव्हाच जेव्हा वेगवेगळी कामं एकाचवेळी करताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिखा श्रेया, प्रतिनिधी
मनात अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे विचार येतात?
मनात अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे विचार येतात?
advertisement

रांची : अनेकजणांचा स्वभाव चंचल असतो. त्यांना एका ठिकाणी शांत बसवत नाही. त्यांना एकावेळी अनेक कामं करायची असतात. असा मल्टीटास्किंग स्वभाव असणं कधीकधी चांगलं असतं, परंतु ते तेव्हाच जेव्हा वेगवेगळी कामं एकाचवेळी करताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव असतात. कारण काहीजण प्रचंड चंचल स्वभावाचे असले, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कुठेतरी हरवलेलं असतं. असं का होतं माहितीये? याचं कारण आहे ज्योतिषशास्त्रात.

advertisement

चेहऱ्यावर तेज असणं, दुःख असणं याचा संबंध थेट कुंडलीतील चंद्र भावाशी असतो. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीचे ज्योतिषी पंडित संतोष कुमार चौबे (रांची युनिव्हर्सिटीतील ज्योतिषशास्त्र विषयाचे  गोल्ड मेडलिस्ट) सांगतात की, कुंडलीतील चंद्र ग्रहाचं स्थान कमजोर असेल, तर व्यक्तीचं मन चंचल होतं. विशेषतः विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. त्यांनी पुस्तक हातात घेतलं रे घेतलं की त्यांच्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे विचार येतात, चक्क झोपही येते.

advertisement

(शनीच्या उदयावर चंद्रग्रहणाची सावली, तरी 3 राशी नशीबवान! सुख येणार)

चंद्र कमकुवत असेल तर नेमकं होतं काय?

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडलीत चंद्राचं स्थान कमकुवत असेल तर व्यक्तीला कोणत्याच कामातून समाधान मिळत नाही. तिच्या चेहऱ्यावर कायम ताण असतो, चिंता असते. प्रत्येक कार्यात तिला शंका असतात. शिवाय तिच्या कामात नियमितपणा नसतो कारण तिचं मन एकाग्र नसतं ते सतत भरकटतं. त्यामुळे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तिला असंख्य अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुंडलीतील चंद्र ग्रहाचं स्थान भक्कम करणं आवश्यक आहे. तरच मनात स्थिरता येईल.

advertisement

(31 दिवसात 5 ग्रह बदलणार चाल; 4 राशी भाग्यवान! पैसा, प्रेम सारंकाही मिळणार)

कसं करावं चंद्राचं स्थान भक्कम?

ज्योतिषी सांगतात की, यापैकी कोणतीही लक्षणं स्वभावात दिसली की, पौर्णिमेला चंद्राला जल अर्पण करा. शिवाय दर सोमवारी ओम नमः शिवाय जप करून जवळच्या शिव मंदिरात महादेवांची पूजा करा, त्यांना जल अर्पण करा. त्यामुळे हळूहळू तुमच्या कुंडलीतील चंद्राचं स्थान भक्कम होईल. शिवाय मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानसाधना करावी.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या/अध्यात्म/
पुस्तक हातात घेतलं रे घेतलं की, झोप लागते? कारण आहे गंभीर, आताच लक्ष द्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल