शनीच्या उदयावर चंद्रग्रहणाची सावली, तरी 3 राशी नशीबवान! सुख येणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनीचं स्थान भक्कम असतं त्यांना अपरंपार सुख अनुभवायला मिळतं, परंतु शनी कमकुवत असल्यास त्यांना नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्यांचा परिणाम थेट मानवी जीवनावर होतो. ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली स्थिती आणि चाल बदलतात. वेळोवेळी राशीप्रवेश करतात. त्यांच्या राशीपरिवर्तनासह ते अस्त होणं, त्यांचा उदय होणं यालादेखील महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या 25 मार्चला शनीची उदय अवस्था सुरू होईल. विशेष म्हणजे याच दिवशी चंद्रग्रहण आहे. 25 मार्च 2024 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरू होणारं चंद्रग्रहण दुपारी 03 वाजून 02 मिनिटांनी संपेल. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनीचं स्थान भक्कम असतं त्यांना अपरंपार सुख अनुभवायला मिळतं, परंतु शनी कमकुवत असल्यास त्यांना नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता चंद्रग्रहणाच्या सावलीत उदय अवस्थेकडे जाणारा शनी आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल.
advertisement
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, यंदा 25 मार्चला धूलिवंदन आहे. जेव्हा सूर्य शनीपेक्षा 15 डिग्रीने पुढे असतो तेव्हा शनी अस्त मानला जातो. अस्त होणं म्हणजे प्रभाव, शक्ती कमी होणं. यंदा धूलिवंदनाच्याच दिवशी शनी अस्ताकडून उदयाला जाईल. 25 मार्चला उदय अवस्थेत जाणारा शनी पुढे वर्षभर याच अवस्थेत असेल. त्याच्या या उदयाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. काही राशींना यातून विशेष फायदा मिळणार आहे. त्या नशीबवान राशी कोणत्या, पाहूया.
advertisement
वृषभ : आपल्यावर शनीची कृपा असेल. शनीदेवांच्या आशीर्वादाने आपलं उत्पन्न वाढेल. घरात सुख, समृद्धीचं वातावरण असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. आपल्या अडचणी हळूहळू कमी होतील.
धनू : आपल्या सर्व आर्थिक अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहेत. कारण आपलं उत्पन्न वाढणार आहे. आरोग्य सुधारेल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. परदेशी प्रवास होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
advertisement
तूळ : आपल्यासाठी यंदाचा होळीचा सण अत्यंत लाभदायी असणार आहे. आपल्याला शनी आणि चंद्र दोघांच्या आशीर्वादाने भरपूर सुख मिळेल. करियरमध्ये प्रगती होईल. इतरांकडे अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील. घरात आनंदाचं वातावरण असेल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
March 03, 2024 2:58 PM IST


