TRENDING:

Amethyst Crystal: मुलांचं अभ्यासात लक्ष नाही? चिंता नको, फक्त 450 रुपयांचं क्रिस्टल करेल काम!

Last Updated:

Crystal for Students: सध्या शालेय परीक्षांचा काळ असून अनेक विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दूर्लक्ष होतं. मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं म्हणून क्रिस्टल लाभदायी ठरेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे काही लक्ष लागत नाही. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे अभ्यासाकडे दूर्लक्षच होते. त्यामुळे पालकच चिंताग्रस्त असतात. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागावं, यासाठी एक चांगला उपाय आहे. या काळात तुम्ही अमेथिस्ट क्रिस्टल स्टोनचा वापर करू शकता. याबाबतच मुंबईतील क्रिस्टल एक्स्पर्ट डॉ. रविकांत यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement

विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अमेथिस्ट क्रिस्टल लाभदायी आहे. जर तुम्ही स्टडी टेबलवर हा स्टोन ठेवला, तर विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित राहातं. तसेच चांगले विचार करण्यासाठी देखील हा अमेथिस्ट क्रिस्टल तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतो. आत्मविश्वास आणि बौद्धिक कौशलता वाढवण्यासाठी हा स्टोन मदत करतो. अमेथिस्ट, अवेंचुरीना, लेपीस अशा सर्व वेगवेगळ्या स्टोनने बनवलेल्या ब्रेसलेट देखील फायदेशीर ठरतात, असे डॉ. रविकांत सांगतात.

advertisement

Teera Kamat: अनुवंशिक आजार अन् 16,00,00,000 रुपयांचं एक इंजेक्शन, आता कशीये चिमुकल्या तीराची तब्येत?

वेगवेगळ्या स्टोनपासून बनवलेलं ब्रेसलेट हे फक्त 450 रुपयांना मिळते. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी हा ब्रेसलेट घातल्यावर त्यांचे लक्ष केंद्रित होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे जास्त कल दिसेल. ब्रेसलेटमध्ये देखील विविध प्रकार उपलब्ध असतात. त्यामुळे योग्य माहिती घेऊन ब्रेसलेट आणि क्रिस्टल खरेदी करावेत, असा सल्ला देखील तज्ज्ञ देतात.

advertisement

क्रिस्टल घेताना फसवणूक

हल्लीच्या काळात स्टोन किंवा क्रिस्टल विकत घेताना तुमची फसवणूक केली जाते. पण बोरीवलीच्या महालक्ष्मी एंटरप्राइजेस या दुकानात गेल्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे योग्य मार्गदर्शन मिळेल. तसेच कोणता स्टोन, कोणत्या कामासाठी वापरला जातो, या सगळ्या गोष्टींची योग्य माहिती इथे पुरवली जाते. विशेष म्हणजे इथे एज्यूकेशन अगरबत्ती देखील मिळते.

कुठं मिळेल क्रिस्टल?

advertisement

जर तुम्हाला देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन विकत घ्यायचे असतील तर बरेलीच्या महालक्ष्मी एंटरप्राईजेस या दुकानाला भेट द्या. बोरवली रेल्वे स्थानकापासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ठक्कर शॉपिंग मॉल या ठिकाणी तुम्हाला हे दुकान दिसेल. या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन मिळतील. तसेच वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन देखील याठिकाणी उपलब्ध आहेत.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Amethyst Crystal: मुलांचं अभ्यासात लक्ष नाही? चिंता नको, फक्त 450 रुपयांचं क्रिस्टल करेल काम!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल