TRENDING:

Bhaubeej 2025: भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त सुरू झाला; सायंकाळी या वेळेनंतर करू नये औक्षण

Last Updated:

Bhaubeej 2025: द्रिक पंचांगनुसार, यंदा भाऊबीजेच्या दिवशी राहु काळाची अशुभ छाया असणार आहे. राहु काळामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं चांगलं मानलं जात नाही. भाऊबीजेला राहु काळाची वेळ आणि भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला दरवर्षी भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. यावर्षी भाऊबीज २३ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. दिवाळीत भाऊबिजेला विशेष महत्त्व आहे. भाऊ-बहिणींचा हा सण रक्षाबंधन इतकाच खास मानला जातो. भाऊबिजेला बहिणी आपल्या भावाला औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. भाऊ त्या बदल्यात आपल्या बहिणींना खास भेटवस्तू देतात.
News18
News18
advertisement

द्रिक पंचांगनुसार, यंदा भाऊबीजेच्या दिवशी राहु काळाची अशुभ छाया असणार आहे. राहु काळामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं चांगलं मानलं जात नाही. भाऊबीजेला राहु काळाची वेळ आणि भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.

राहु काळ किती वाजल्यापासून?

यावेळी भाऊबीजेवर राहु काळाचा प्रभाव राहणार आहे. द्रिक पंचांगनुसार, राहु काळ २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि २ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होईल. या काळात भावाला औक्षण करणं टाळावं.

advertisement

भाऊबीजेचे शुभ मुहूर्त -

पहिला मुहूर्त दुपारी १ वाजून १३ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.

अभिजीत मुहूर्त असेल, सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल.

विजय मुहूर्त असेल, दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.

गोधुली मुहूर्त असेल, ज्याची वेळ संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी सुरू होऊन संध्याकाळी ६ वाजून ०९ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजे सायंकाळी ६ वाजून ०९ मिनिटांनंतर औक्षण करू नये, त्याच्या आधी भाऊबीज साजरी करावी.

advertisement

भावाला औक्षण-टिळा कसा लावावा -

या दिवशी भावाने सकाळी स्नान करावे. आपल्या बहिणीच्या घरी जावे आणि तिथे बहिणीने बनवलेले भोजन खावे. त्यानंतर औक्षण करावे. भावानं आपल्या शक्तीनुसार बहिणीला भेटवस्तू द्यावी.

भाऊबीजेचे उपाय -

टिळा लावताना बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकू किंवा केशरचा टिळा लावल्यास त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

या दिवशी टिळा लावताना यमदेवासाठी दिवा (दीपक) देखील लावावा, ज्यामुळे अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, असे मानले जाते.

advertisement

Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी जा अन् संध्याकाळी परत या, कल्याणमधील फेमस पिकनिक स्पॉट, तुम्ही पाहिले का?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Bhaubeej 2025: भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त सुरू झाला; सायंकाळी या वेळेनंतर करू नये औक्षण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल