TRENDING:

Ganesh chaturthi 2024: बाप्पा मोरया! गणेशोत्सवात आरतीनंतर या एका मंत्राचा करा जप; विघ्ने टळतील, संकटांचा नाश

Last Updated:

Ganesh chaturthi 2024: संकटनाशन गणेश स्तोत्राचे वर्णन नारद पुराणात आहे. असे सांगितले जाते की, एकदा नारद संकटात सापडले होते. मग त्यांनी शंकराकडून प्रेरणा घेऊन संकटनाशन गणेश स्तोत्राची रचना केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गणेशोत्सवाची सर्व गणेश भक्तांना आस लागली आहे. गणेशोत्सवामध्ये पूजा करताना गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश स्तोत्राचे पठण करावे, यामुळे आपल्या आयुष्यातील दु:ख दूर होतील. गणेशाच्या कृपेने येणारी संकटे दूर होतील. जीवनात सुख-समृद्धी आणि शांती येईल. या स्तोत्राचे नाव संकटनाशन गणेश स्तोत्र आहे. ते संस्कृतमध्ये लिहिलेले आहे. संस्कृत वाचता येत नसेल तर पूजेच्या वेळी गणपतीचे ध्यान करताना हा स्तोत्र ऐका. आपल्याला याचा फायदा होईल. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी संकटनाशन गणेश स्तोत्राची अधिक माहिती दिली आहे.
News18
News18
advertisement

संकटनाशन गणेश स्तोत्र नारद पुराणात -

संकटनाशन गणेश स्तोत्राचे वर्णन नारद पुराणात आहे. असे सांगितले जाते की, एकदा नारद संकटात सापडले होते. मग त्यांनी शंकराकडून प्रेरणा घेऊन संकटनाशन गणेश स्तोत्राची रचना केली. त्यामुळे विघ्नहर्ता श्री गणेशाने त्यांचे संकट दूर केले. तेव्हापासून संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण केले जात होते.

संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण कसे करावे -

advertisement

सकाळी स्नान केल्यानंतर शुभ मुहूर्तावर श्रीगणेशाची पूजा करावी. त्यांना लाल फुले, सिंदूर, अक्षत, धूप, दिवा, दुर्वा, हळद, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करा. पूजेत त्यांना मोदक किंवा लाडू अर्पण करा. त्यानंतर संकटनाशन गणेश स्तोत्राचे किमान 5 वेळा पठण करावे. पाठ करताना योग्य उच्चार वापरा. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करतील.

advertisement

Numerology: खूप त्रास सोसला! या जन्मतारखांच्या लोकांना आता सुखाचे दिवस, खुशखबर

संकटनाशन गणेश स्तोत्र -

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम्। भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये॥1॥

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम्। तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम्॥2॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम्॥3॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन्॥4॥

advertisement

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो॥5॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम्॥6॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते। संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः॥7॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः॥8॥

॥इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम्॥

advertisement

घरी, मंडपात गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा अभिजित मुहूर्त! या चुका करू नये

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh chaturthi 2024: बाप्पा मोरया! गणेशोत्सवात आरतीनंतर या एका मंत्राचा करा जप; विघ्ने टळतील, संकटांचा नाश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल