TRENDING:

आई राजा उदो उदो! तुळजाभवानी मंदिरात धगधगत्या अग्निचा थरार, कसा असतो भेंडोळी उत्सव?

Last Updated:

Diwali 2024: भेंडोळी उत्सव हा उत्तरेत काशी आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर येथेच साजरा केला जातो. हा उत्सव नेमका काय आहे हे जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय साबळे, प्रतिनिधी
advertisement

धाराशिव: तुळजापूरची तुळजाभवानी देवी ही अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत मानली जाते. दिवाळीतील तुळजाभवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अश्विन अमावास्येला नरक चतुर्दशीच्या सायंकाळी तुळजाभवानी मंदिरात भेंडोळी उत्सव साजरा करण्यात येतो. तुळजाभवानी मातेला पहाटे सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान होते. सायंकाळी भेंडोळी उत्सव साजरा करण्यात येतो. यानंतर रात्री मंदिरात लक्ष्मीपूजन, खजिनापूजन करण्यात येते. सदरील भेंडोळी उत्सव हा उत्तरेत काशी आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर येथेच साजरा केला जातो. हा उत्सव नेमका काय आहे हे जाणून घेऊ.

advertisement

भेंडोळी म्हणजे काय?

भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब व साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांड्यावर लावला जातो. यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात. भेंडोळीची संपूर्ण बांधणी तयारी व भेंडोळी प्रज्वलन श्री काळभैरव मंदिराच्या समोर केली जाते.

advertisement

दिवाळीत लक्ष्मीपूजन कधी करावे ? जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजा पद्धत

कसा साजरा होतो भेंडोळी उत्सव?

भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून ते श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात हा भेंडोळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भेंडोळी महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. तर धगधगत्या अग्निचा थरार याची देही याची डोळा भावीकांनी अनुभवला. खरंतर देशातील श्री काशी तीर्थक्षेत्र आणि श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र येथेच हा भेंडोळी महोत्सव साजरा करण्यात येतो.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
आई राजा उदो उदो! तुळजाभवानी मंदिरात धगधगत्या अग्निचा थरार, कसा असतो भेंडोळी उत्सव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल