भक्तीभावानं गणेशाची पूजा आणि प्रार्थना केल्यानं व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्तता मिळते. यासोबतच, या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते, असे मानले जाते. फेब्रुवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 5 उपाय करावेत जेणेकरून शुभ लाभ मिळतील, याविषयी पंडित रमाकांत मिश्रा यांनी सांगितलेले उपाय जाणून घेऊ.
कुटुंबात शांती आणि आनंदासाठी
advertisement
गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात. काही कारणांनी कुटुंबातील शांती आणि आनंद भंग झाली असेल, घरात पुन्हा शांती आणि आनंद राहावा यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात गणेशाची चांदीची मूर्ती स्थापित करावी. यासोबतच, संध्याकाळी गणपतीची पूजा करता तेव्हा त्यांना 5 हळकुंड गणपतीला अर्पण करा. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंद आणि शांती परत येईल.
संपत्ती वाढवण्याचे उपाय
गणपतीला प्रसन्न केल्याने घरात समृद्धी येते, मग ती पैशाची समृद्धी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टींची. आपल्याला बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या येत असतील आणि तुमची संपत्ती वाढत नसेल, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तीनमुखी दिवा लावावा आणि त्याच्यासमोर ॐ गं गौं गणपते विघ्न विनाशिने स्वाहा या मंत्राच्या 21 माळा जप कराव्यात. लवकरच तुम्हाला या उपायाचे फायदे मिळायला सुरुवात होईल.
नोकरी आणि व्यवसायात यशासाठी
जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला मोदकासोबत लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, सुपारी इ. अर्पण करा. यासोबतच या दिवशी अथर्वशीर्षाचे पठण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल.
मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी
श्री गणेशाला बुद्धिमत्तेची देवता म्हणून देखील ओळखले जाते. आपल्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याने एकाग्रतेने अभ्यास करावा आणि त्याची बुद्धिमत्ता आणि शहाणपण नेहमीच चांगले राहावे, तर यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलाला गणेश रुद्राक्ष घालायला लावावा. लवकरच फायदे दिसून येतील.
ग्रह दोषांच्या शांतीसाठी
हिंदू धर्मात गायीला माता म्हटले जाते. कारण तिच्यात 33 कोटी देवी-देवता राहतात असे मानले जाते. एखाद्या व्यक्तीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गाईला हिरवा चारा दिला तर सर्व ग्रहदोष दूर होतात आणि कामातील अडथळे देखील दूर होतात, असे मानले जाते.
पुढच्या जन्मात आपण कोण असेल? गरुड पुराणात सांगितलंय ते ओळखण्याचं रहस्य
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)