TRENDING:

31 दिवसात 5 ग्रह बदलणार चाल; 4 राशी भाग्यवान! पैसा, प्रेम सारंकाही मिळणार

Last Updated:

मार्च महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने विशेष असणार आहे. कारण या महिन्यात पाच ग्रहांची स्थिती बदलेल. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
याच महिन्यात आपलं प्रमोशन होऊ शकतं.
याच महिन्यात आपलं प्रमोशन होऊ शकतं.
advertisement

अयोध्या : ज्योतिषशास्त्रात सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांना प्रचंड महत्त्व आहे. हे ग्रह वेळोवेळी रास बदलतात. काही दिवस त्यांचा मुक्काम एका राशीत असतो, तर काही दिवस दुसऱ्या राशीत. या ग्रहांचा आणि त्यांच्या चालबदलाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो.

अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, मार्च महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने विशेष असणार आहे. कारण या महिन्यात पाच ग्रहांची स्थिती बदलेल. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. त्यातून काही राशींच्या वाट्याला सुख येईल.

advertisement

(रुद्राक्ष घालण्यापूर्वी आयुष्य सुखी होतं, आता असंख्य अडचणी! तुम्ही 'ते' नियम पाळताय ना?)

5 ग्रह चाल बदलणार!

31 दिवसांच्या या महिन्यात 5 ग्रहांची चाल बदलणार आहे. बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ ग्रहाचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होईल. तर, याच महिन्यात कुंभ राशीत शनीची उदय अवस्था सुरू होईल. दरम्यान, 7 मार्चला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 14 मार्चला सूर्याचा मीनप्रवेश होईल. त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे 15 मार्चला मंगळ ग्रह कुंभ राशीत जाईल. त्यानंतर शनी आणि बुध अस्त अवस्थेतून उदय अवस्थेत येतील. तर, 26 मार्चला मेष राशीत बुध ग्रहाचा प्रवेश होईल. त्यानंतर महिन्याच्या शेवटी 31 मार्चला शुक्र मीन राशीत जाईल.

advertisement

(शनीच्या उदयावर चंद्रग्रहणाची सावली, तरी 3 राशी नशीबवान! सुख येणार)

'या' राशीच्या व्यक्तींचा फायदा!

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्क, वृषभ, मेष आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अत्यंत भाग्याचा असणार आहे. याच महिन्यात आपलं प्रमोशन होऊ शकतं, आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल, थांबलेली सर्व कामं पूर्ण होतील, कोणाच्या प्रेमात असाल तर वाट्याला सुखाचे क्षण येतील, करियरमध्येही प्रगती होईल.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या/अध्यात्म/
31 दिवसात 5 ग्रह बदलणार चाल; 4 राशी भाग्यवान! पैसा, प्रेम सारंकाही मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल