डाव्या सोंडेचा गणपती
बाप्पाची उपासना वेष्ठी आणि समष्ठी अशा दोन प्रकारे केली जाते. समष्ठी म्हणजे डाव्या सोंडेच्या गणपती बाप्पाची उपासना होय. ससारिक लोकांना सर्व प्रकारच्या सुखसोई उपभोग प्राप्त करून घेण्यासाठी डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासन केली जाते. डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासनाही सौम्य पद्धतीची आहे. सर्वसामान्य घरगुती अशी ही उपासना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा योग्य मानली जाते, असे गुरुजी सांगतात.
advertisement
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या मूर्तीचं तोंड कोणत्या दिशेला असावं? जाणून घ्या योग्य दिशा आणि कारण
उजव्या सोंडेचा गणपती
ज्यांना फक्त स्वतःचा आत्मलाभ, आत्मसाक्षात्कार किंवा मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा योग्य मानली जाते. एखादी अति उत्कट गोष्ट प्राप्त करायची असते तेव्हा उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना केली जाते. ही उपासना अत्यंत कठीण मानली जाते. त्यामुळे अशा प्रकारची उपासना एखादा योगी किंवा खूप निष्ठावंत भक्तांकडून केली जाते, असे धानोरकर गुरुजी सांगतात.
दरम्यान, सर्वसामान्यपणे गणेशोत्सवात डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा केली जाते. सर्वसामान्य भाविकांसाठी डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासना फायद्याची मानली जाते, असेही गुरुजी सांगतात.





