सोलापूर शहरातील चौपाड माडे गल्ली येथे वाडेकर कुटुंब राहण्यास आहे. वाडेकर कुटुंब हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडविरे गावातील रहिवासी आहे. संदीप वाडेकर यांचे पूर्वज कोकणातून सोलापूरला 70 ते 80 वर्षांपूर्वी आले आणि सोलापुरात स्थायिक झाले. कोकणात ज्या प्रकारे गणेशाला माशांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच तेथील गौरींना मटणाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
advertisement
काय आहे आख्यायिका?
‘गौरीचा मटणाचा नैवद्य’ हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. परंतु, याबाबत वाडेकर यांनीच एक आख्यायिका सांगितली आहे. “भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह केव्हा झाला होता तेव्हा ती माहेरी जाण्यासाठी निघाली होती तेव्हा भगवान शंकर यांनी माहेरी एकविरा पाठवता पार्वती सोबत काही देते ही पाठवले होते. पार्वती माहेरी गेल्यावर शाकाहारी जेवण करत होती पण दैत्य शाकाहारी जेवण करत नव्हते. तेव्हा स्वतः पार्वती यांनी शाकाहारी असूनही दैत्यांना मांसाहार करून दिला होता तेव्हा ते दैत्य जेवले. तसेच दुसरी एक अशी आख्यायिका आहे की गौरी वर्षातून एकदा माहेरी येते. त्यामुळे तिचे सगळे लाड पुरवले जातात,” असे संदीप वाडेकर सांगतात.
गौरीला मटणाचा नैवेद्य
संदीप वाडेकर यांच्या गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवला जातात. त्या नैवेद्यामध्ये मटन, भाकरी, भात, टोमॅटो, कांदा आणि वडे हे पदार्थ असतात. तसेच शाकाहारीमध्ये चपाती, भात, वरण, पालेभाज्या आणि गोड पदार्थ असा नैवेद्य दाखवला जातो. ज्यावेळेस गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो. त्यावेळेस गणपती आणि गौरी यांच्यामध्ये एक पडदा मारला जातो, अशी माहिती संदीप वाडेकर यांनी दिली.