पुणे : हिंदू धर्मात अनेक पुजापाठ हे सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाला पठण करण्याचे विविध फायदे देखील आहेत. या प्रार्थनेचे नियमित पठण केल्याने व्यक्तींना त्यांच्या जीवनात सांत्वन, शक्ती आणि मार्गदर्शन मिळू शकते. तसंच संरक्षण देऊन अडथळे दूर होतात. संकटापासून संरक्षण करणारी देवता म्हणून हनुमानाची पूजा केली जाते. तर हनुमान चालीसा पठण करण्याचे फायदे काय आहेत? याबद्दच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे.
advertisement
समस्यांचे निराकरण हनुमान चालिसामध्ये
जीवनात माणूस अनेक प्रकारच्या समस्यांनी त्रस्त असतो. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार अनेक प्रकारचे दोष असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. हे सर्व समस्यांचे निराकरण हनुमान चालिसामध्ये आहे. दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ शकतं नाही. हनुमानजी हे या कलियुगातील जागृत देव आहेत. ज्या व्यक्तीवर हनुमानजींची असीम कृपा होते, त्याचे जीवन आनंदाने भरून जाते, असं ज्योतिषी राजेश जोशी सांगतात.
Hanuman Jayanti 2024: मारुतीरायांना साकडं घालणं पुरेसं नाही, चुकूनही करू नका 'ही' 3 कामं
हनुमान चालिसा पठण करण्याचे फायदे
1) दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो.
2) दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते.
3) हनुमान चालिसाचे पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात.
4) रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणत्याही कामात अडथळा येत नाही.
5) माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते.
6) दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.
7) हनुमान चालीसाचे नियमित पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण हनुमानजी स्वतः करतात.
8) जो व्यक्ती रोज हनुमान चालिसाचा पाठ करतो तो रोगांपासून दूर राहतो.
9) हनुमान चालिसाचे नित्य पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
10) हनुमानजींच्या भक्तांवर वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही.
11) हनुमान चालिसाचा पाठ केल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
12) हनुमान चालिसाचे पठण केल्यानेही रामाची कृपा प्राप्त होते.
वर्षांमागून वर्ष सरले, आला अद्भुत योग; हनुमान जयंतीला शनीदोष दूर करण्याची सुवर्णसंधी
हनुमान चालिसाची प्रत्येक ओळ हा एक महामंत्र आहे. प्रत्येक माणूस दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. हनुमान चालिसाचे नित्य पठण केल्याने शनि साडेसाती आणि ढैय्यापासून मुक्ती मिळते.रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात, अशी माहितीही ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





