TRENDING:

Hanuman Jayanti 2025 : मनातील मनोकामना होतील पूर्ण, हनुमान जयंतीला करा हे उपाय, Video

Last Updated:

चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी हनुमान जयंती संपूर्ण देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. यावर्षी ही जयंती शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी हनुमान जयंती संपूर्ण देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. यावर्षी ही जयंती शनिवार, 12 एप्रिल 2025 रोजी आहे. भगवान हनुमान हे चिरंजीवी, संकटमोचक आणि रामभक्त म्हणून पूजले जातात. त्यांच्या भक्तीने भक्तांच्या जीवनातील संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, असा दृढ विश्वास आहे. धर्म अभ्यासिका प्रभा माने यांच्या मार्गदर्शनानुसार आज आपण हनुमान जयंतीची पूजा कशी करावी आणि कोणते उपाय करावे याबद्दल जाणून घेऊयात.
advertisement

शुभ मुहूर्त

यावर्षीच्या हनुमान जयंतीसाठी दोन प्रमुख शुभ मुहूर्त आहेत. सकाळचा मुहूर्त: 7:34 ते 9:12 सायंकाळचा मुहूर्त: 6:46 ते 8:08 आहे.

स्वस्तात मस्त लग्नासाठी गिफ्ट, फक्त 50 रुपयांपासून, खरेदीसाठी अमरावतीत हे ठिकाण बेस्ट ऑप्शन!

पूजा विधी

या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ लाल वस्त्र परिधान करावीत. हनुमानजींच्या मूर्तीला लाल फुले अर्पण करून, सिंदूरात चमेलीचे तेल मिसळून चोळा चढवावा. नैवेद्य म्हणून चणे, गूळ, नारळ तसेच बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू अर्पण करावेत.

advertisement

स्तोत्र आणि पाठ

पूजेदरम्यान हनुमान चालिसा, बजरंग बाण, हनुमान अष्टक, सुंदरकांड आणि मारुती स्तोत्र यांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.

हनुमान चालिसा पठणाचा विशेष उपाय

हनुमान चालिसामध्ये अपार शक्ती आहे. हनुमान चालिसाची प्रत्येक ओळ भक्ताच्या रक्षणासाठी कवचासारखी कार्य करते. हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक भक्त 100 वेळा हनुमान चालिसा पठण करण्याचा संकल्प करतात. सकाळी लवकर उठून अखंड ज्योत लावून हे पाठ केल्यास बजरंगबली विशेष प्रसन्न होतात. जमल्यास 1, 5,7,11 अशा संख्यांमध्ये पठण करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते.

advertisement

रामभक्तीचा प्रभाव

हनुमानजींना भगवान श्रीराम अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांच्या उपासनेत रामाचे नामस्मरण केल्यास ते अधिक लवकर प्रसन्न होतात. हनुमान म्हणजे निष्ठा, पराक्रम आणि नम्रतेचे मूर्तिमंत प्रतीक. त्यांची भक्ती केल्याने आत्मबल वाढते आणि मन स्थिर होते.

उत्सवाचे आयोजन

मुंबईसह देशभरातील प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये दिवसभर विशेष पूजन, आरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास करून मंदिरांमध्ये सेवा, आरती आणि संकीर्तन करतात. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे, अन्नदान आणि रामनाम जपाचाही कार्यक्रम आयोजित केला जातो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Hanuman Jayanti 2025 : मनातील मनोकामना होतील पूर्ण, हनुमान जयंतीला करा हे उपाय, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल