स्वस्तात मस्त लग्नासाठी गिफ्ट, फक्त 50 रुपयांपासून, खरेदीसाठी अमरावतीत हे ठिकाण बेस्ट ऑप्शन!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी वास्तुपूजा वाढदिवस आणि बरेच प्रसंग असतात. अशावेळी तुम्ही आकर्षक अशा फोटो फ्रेम गिफ्ट म्हणून देऊ शकता.
advertisement
advertisement
जय अंबे फोटो फ्रेम येथील त्रिशूल गोरे माहिती देताना सांगतात की, आमच्याकडे होलसेल दरात फोटो फ्रेम बनवून मिळतात. आम्ही स्वतः बनवत असल्याने त्यावर एक्स्ट्रा चार्जेस काहीही लागत नाही. अगदी छोट्या साईजपासून ते तुम्हाला पाहिजे त्या साईजपर्यंतच्या फ्रेम आम्ही बनवून देऊ शकतो. त्याचबरोबर आमच्याकडे उपलब्ध सुद्धा आहेत.
advertisement
सध्या लग्नसराईमध्ये राधा-कृष्ण फ्रेम गिफ्ट देण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार 250 रुपयांपासून फ्रेम आमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्हाला बनवून पाहिजे असल्यास त्या सुद्धा आम्ही उपलब्ध करून देतो. ग्राहकांच्या पसंती आणि मताप्रमाणे आम्ही फ्रेम पुरवतो. त्यात सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटी आहेत. 250 रुपयांपासून ते 20 हजारपर्यंत फ्रेम आहेत. साईज आणि क्वालिटीनुसार प्राईस वाढत जाते.
advertisement
advertisement


