TMKOC फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, हृदयद्रावक पोस्ट शेअर करत म्हणाला 'पुन्हा कधीही...'

Last Updated:

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'बाघा' या आपल्या मजेदार पात्राने घराघरात हसवणारे अभिनेते तन्मय वेकारिया यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

News18
News18
मुंबई : सब टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'बाघा' या आपल्या मजेदार पात्राने घराघरात हसवणारे अभिनेते तन्मय वेकारिया यांच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तन्मय यांच्या आईचे नुकतेच निधन झाले असून, या बातमीने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. आईच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या तन्मयने सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

आईच्या आठवणीत तन्मय भावूक

अभिनेता तन्मय वेकारिया याने इंस्टाग्रामवर आईसोबतच्या आठवणींचा एक इमोशनल रील व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याचे बालपणीचे फोटो, आई-वडिलांसोबतचे काही खास क्षण आणि त्याची लेक व आईचे गोड क्षण पाहायला मिळतात. या रीलला 'दुश्मन' चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणे 'चिठी ना कोई संदेश' चे बॅकग्राउंड म्युझिक देण्यात आले आहे, ज्यामुळे ही पोस्ट अधिकच मन हेलावून टाकणारी ठरली आहे.
advertisement

"आता फक्त आठवण आणि फोटो..."

तन्मयने आईच्या जाण्यानंतरची असह्यता आपल्या कॅप्शनमधून व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे, "हे दुर्दैव आहे की, तुम्ही आता फक्त तिला फोटोंमध्ये पाहू शकता आणि मनात तिची उपस्थिती जाणवू शकता, पण तुम्ही तिला पुन्हा कधीही मिठी मारू शकत नाही किंवा समोरासमोर पाहू शकणार नाही... मिस यू माई... तुझी आठवण नेहमीच येईल. मला खात्री आहे की, तू आता स्वर्गात सर्वोत्तम आणि सुखाच्या ठिकाणी असशील."
advertisement
advertisement
तन्मयच्या या हृदय पिळवटून टाकणाऱ्या पोस्टनंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार त्याला धीर देत आहेत आणि श्रद्धांजली वाहत आहेत.

'बाघा' आधीच्या लहान भूमिका

तन्मय वेकारिया 'बाघा'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असले तरी, यापूर्वी त्यांनी याच मालिकेत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. ते मालिकेत शालेय शिक्षक, रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर आणि मोलकरीण रुक्मिणीचा पती अशा विविध पात्रांमध्ये दिसले होते.
advertisement
'तारक मेहता' मालिकेत येण्यापूर्वी तन्मय गुजराती नाट्यक्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी यांच्यासोबतही रंगभूमीवर काम केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
TMKOC फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, हृदयद्रावक पोस्ट शेअर करत म्हणाला 'पुन्हा कधीही...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement