जालना पोलिसांचा अनोखा उपक्रम! शहरामध्ये पोलिस व्हॅन करणार कायद्याविषयक अनोखी जनजागृती
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संवाद आणि संपर्क प्रस्थापित व्हावा यासाठी जालना पोलीस दलाने अनोखा उपक्रम सुरू केलाय.
जालनाः सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांविषयी असलेली अनावश्यक भीती कमी व्हावी, नागरिकांना कायद्याचं योग्य ज्ञान मिळावं, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती व्हावी, तसेच पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संवाद आणि संपर्क प्रस्थापित व्हावा यासाठी जालना पोलीस दलाने अनोखा उपक्रम सुरू केलाय. एलईडी स्क्रीन असलेल्या व्हॅनच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील गाव खेड्यामध्ये नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. पाहूया जालना पोलीस दलाच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल.
नागरिकांनी घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, अडचणीच्या काळात कोणत्या क्रमांकावर संपर्क साधावा यासह विविध योजनांच्या माहितीचीही यातून जनजागृती होणार आहे. शक्य असल्यास व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवावे. पोलिसांना कशा प्रकारे मदत करावी, या उद्देशानेही हे वाहन जनजागृती करणार आहे. ही व्हॅन पोलिस ठाणेनिहाय गावोगावी जाऊन महिला, पुरुष, तरुण, तरुणी, ज्येष्ठांमध्ये एलईडीद्वारे जनजागृती करणार आहे. तसेच विविध शाळा, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठांतही जनजागृती करणार आहे.
advertisement
या बाबींवर केली जाणार जनजागृती…
गुन्हे, चालू असलेले अवैध धंदे याबाबत सामान्य नागरिक सहसा अनभिज्ञ राहतात. यामुळे या नागरिकांनी अशा गुन्ह्यांबाबत कसे सजग व्हावे. महिला, बालकांच्या अत्याचारासंदर्भात काय काळजी घेतली पाहिजे. आपल्या परिसरात घडत असलेल्या कोणत्या हालचालींची पोलिसांना माहिती दिली पाहिजे, याबाबतही जनजागृती या व्हॅनमधून होईल.
पोलिस ठाणेनिहाय केले नियोजन
advertisement
पहिल्या टप्यात सध्या या व्हॅनद्वारे जालना शहरात जनजागृतीचे नियोजन केले आहे. येत्या काळात ग्रामीण भागातही हे वाहन पाठविले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १९ ठाण्यांचा आढावा घेऊन त्याबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
October 24, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
जालना पोलिसांचा अनोखा उपक्रम! शहरामध्ये पोलिस व्हॅन करणार कायद्याविषयक अनोखी जनजागृती

