IND vs AUS : कुलदीपचं कमबॅक; दोघांना डच्चू, शेवटच्या वनडेची Playing XI, गिल-गंभीर चूक सुधारणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे, त्यामुळे भारताने ही सीरिज आधीच गमावली आहे. यानंतर आता व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडिया शनिवारी मैदानात उतरणार आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे, त्यामुळे भारताने ही सीरिज आधीच गमावली आहे. यानंतर आता व्हाईट वॉश टाळण्यासाठी टीम इंडिया शनिवारी मैदानात उतरणार आहे. सिडनीमध्ये सीरिजची तिसरी आणि शेवटची वनडे मॅच खेळवली जाणार आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने बॅटिंग मजबूत करण्यासाठी ऑलराऊंडरना संधी दिली, त्यामुळे भारताची बॉलिंग कमजोर झाली, ज्याचा फटका टीम इंडियाला बसला. आता तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील.
कुलदीप यादवला संधी मिळणार?
आतापर्यंत, भारताने अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे स्पिन बॉलिंगची जबाबदारी सोपवली. हे दोघं बॉलिंगसह चांगली बॅटिंगही करतात, पण दोघांना बॉलिंगमध्ये प्रभाव पाडता आला नाही. ऑस्ट्रेलियन बॅटरना सुंदर आणि अक्षर पटेलचा सामना करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही, त्यामुळे तिसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. कुलदीप यादव हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याने आशिया कप आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
रेड्डी-राणाला डच्चू?
टीम इंडियाने पहिल्या दोन्ही वनडेमध्ये ऑलराऊंडरना प्राधान्य दिले, त्यामुळे नितीश कुमार रेड्डीला आठव्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली, पण रेड्डीला ना बॉलिंगमध्ये ना बॅटिंगमध्ये चमक दाखवता आली. तर हर्षित राणालाही मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही, त्यामुळे हर्षितऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंग स्टाईलला अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सीरिज आधीच जिंकलेली ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्यात स्टार्क आणि हेजलवूडला विश्रांती देऊ शकते.
advertisement
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, एलेक्स कॅरी, कुपर कॉनली, मिचेल ओवन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, मॅट कुहनेमन
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 8:21 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : कुलदीपचं कमबॅक; दोघांना डच्चू, शेवटच्या वनडेची Playing XI, गिल-गंभीर चूक सुधारणार!


