होळीची संपूर्ण माहिती आणि कथा (Holi Information In Marathi)
होळीचा दिवस दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णुभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी संबंधित आहे. असं मानलं जातं की, एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करत होता. तो भगवान विष्णूंचा कट्टर विरोधक होता. पण, त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त होता. तो रात्रंदिवस विष्णुची पूजा करत असे. मुलगा विष्णूभक्त असल्यामुळे हिरण्यकश्यपू त्रस्त झाला होता. त्याने अनेकदा प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला.
advertisement
होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी, तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम, फायदा की तोटा?
एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी आपली बहीण होलिकेला दिली. होलिकेनी प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्याचे आदेश हिरण्यकश्यपूने दिले. कारण, होलिका अग्नीत न बसली तरीही तिला काहाही होणार नाही असं वरदान तिने मिळवलं होतं. पण, भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका आगीच्या ज्वाळांमध्ये भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहन हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन म्हणतात.
महाराष्ट्रामध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी होळीतील राखेनी एकमेकांना रंगवलं जातं. रंगपंचमीदिवशी महाराष्ट्रात रंगांची उधळण होते आणि रंगपंचमी साजरी होते. उत्तर भारतात होळीची मोठी परंपरा आहे. ऐतिहासिक शहर असलेल्या झाशीमध्येही होळीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण होते.
होलिका दहन मंत्र (Holika Dahan Mantra In marathi)
होलिका दहनाच्या दिवशी 'ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधीं पुष्टीवर्धनम्'. 'उर्वारुकमिव बंधनं मृत्युोर्मक्षिय ममृतात्' या मंत्राचा जप करावा. या शिवाय होलिका दहनावेळी गायत्री मातेचा महामंत्र 'ॐ भुर्भुव: स्वा: तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात' या मंत्राचाही जप करावा.
