TRENDING:

होलिका दहन का करतात? जाणून घ्या होळी पूजनाची योग्य पद्धत, Video

Last Updated:

फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा असून दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा: हिंदू धर्मात विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे होलिका दहन किंवा होळी पूजन होय. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा असून दुसऱ्या दिवशी धूलिवंदन साजरे केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून हा सण साजरा केला जातो. याबाबतच वर्धा येथील ज्योतिषी तरुण शर्मा यांनी माहिती दिली आहे.

advertisement

काय आहे आख्यायिका?

होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी श्री हरीचे भक्त प्रल्हाद यांचा अग्निही नाश करू शकली नाही. तर अग्नीने जळून न जाण्याचे वरदान प्राप्त झालेली होलिका भस्मसात झाली. तसेच होळीच्या दिवशी शत्रू ही मित्र बनून जातात आणि एकमेकांना रंग लावतात. यामुळे हा फक्त धार्मिक सणच नाही तर या सणामुळे बंधुभाव वाढतो, असे शर्मा सांगतात.

advertisement

तृतीयपंथीयांनाही प्रेम होतं का, विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकील शिवानी सुरकार यांनी व्यक्त केल्या 'या' भावना

हा आहे शुभमुहूर्त

यंदा 24 मार्च 2024 रोजी पौर्णिमा तिथी सकाळी 9 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 25 मार्चला दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी समाप्त होईल. होलिका दहन हे पौर्णिमेच्या रात्री केलं जातं. त्यामुळे यंदा 24 मार्चच्या रात्री होणार आहे. यावर्षी शुभ मुहूर्त 24 मार्चला रात्री 11 वाजून 13 मिनिट ते 12 वाजून 27 मिनिटपर्यंत आहे. म्हणजेच एकूण 1 तास 14 मिनिटांचा वेळ मिळत आहे.

advertisement

अशी करावी पूजा

पूजेपूर्वी अंघोळ करा. नंतर उत्तर किंवा पूर्वेच्या दिशेने उभे राहून होळीची पूजा करा. त्यानंतर फुलं, कच्चं सूत किंवा कापूस, गूळ, हळकुंड, बत्तासे, गुलाल, नारळ, पाच किंवा 7 प्रकारचे धान्य आणि पाणी अर्पण करा. यांनंतर होळीला प्रदक्षिणा घाला आणि नंतर दहन करा, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

शुभ फळ प्राप्तीसाठी जपमाळांचा जप करताना कोणते नियम पाळावेत? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती

advertisement

होलिका दहन वैज्ञानिक कारण

होलिका दहन वेळी वातावरणात उष्णता वाढलेली असते. परंपरेचं पालन करून अग्निभोवती परिक्रमा केली जाते. अग्नीच्या उष्णतेमुळे शरीरातील जिवाणू नष्ट होतात आणि त्यामुळे शरीर शुद्ध होते. तसेच होळी अशावेळी येते जेव्हा वातावरणात बदल होत असतो. थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागत असते. अशात सर्वांना आळस जाणवतो. त्यामुळे होळी प्रमाणे आपल्यातील आळस आणि नकारात्मक ऊर्जा जळून जाऊ दे अशी प्रार्थना केली जाते, असेही शर्मा सांगतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
होलिका दहन का करतात? जाणून घ्या होळी पूजनाची योग्य पद्धत, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल