का करावी पूजा?
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला आहे की मार्गशीर्ष महिना आहे माझ्या स्वरूप आहे. म्हणून या महिन्याला एक विशेष महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये लक्ष्मी सर्वांवरती प्रसन्न असते. जो जो तिची आराधना करतो त्यांच्यावरती लक्ष्मी ही प्रसन्न होते. यावर्षी यामहिन्यात पाच गुरुवार आलेले आहे. यामुळे हा महिना अत्यंत विशेष असा होणार आहे. सर्वांनी या महिन्यांमध्ये माता लक्ष्मीला आपल्यावरती प्रसन्न करून घ्यावं असा हा महिना आहे. हे सर्वांनी करावं पण सुवासिनींना या व्रतामध्ये विशेष स्थान हे प्राप्त झालेल्या आहे. सुवासिनी हे व्रत करतील तर त्यांना फळ प्राप्त होईल असा स्मृतिग्रंथामध्ये वर्ण आलेला आहे, असं श्रीराम धानोरकर सांगतात.
advertisement
तब्बल 100 वर्षांनी निर्माण होतोय राजयोग; 'या' 3 राशींवर पडणार जणू पैशांचा पाऊस
पूजा कशी करावी?
गुरुवारी गणपती बाप्पाचे पूजन करावे वरूणाच पूजन करावे. वरूणाच पूजन झाल्यानंतर कळसा शेजारी धान्य रचून त्याच्यावरती महालक्ष्मी यंत्र हे स्थापन करावे. त्याची पूजा करावी किंवा मूर्तीची पूजा करावी. ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या कुलदैवतेची फोटो किंवा मूर्ती मांडून त्याची देखील पूजा करावी. त्यासोबतच महालक्ष्मीची यथासांग पूजा करावी. शक्य झाल्यास दुधाने किंवा उसाच्या रसाने महालक्ष्मीचा अभिषेक करावा हे महालक्ष्मीचं प्रिय द्रव आहेत. त्यानंतर महालक्ष्मीला धान्यावरती विराजमान करून हळदीकुंकू अष्टगंध लावून ओवाळून घ्यावे.
shadashtak yog: शनि-केतुचा षडाष्टक योग! 4 राशींना मिळणार नशीबाची साथ, डबल होणार बँक बॅलन्स
त्यानंतर नैवेद्य म्हणून पायस किंवा खीर हे देखील दाखवावे. माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कमलगट्टा, गुंज, धने आणि लाह्या हे देखील अर्पण करावे. सर्व पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीचा जप करावा किमान 108 वेळा तरी. अशी सर्व पूजाही करावी. शेवटच्या गुरुवारी पाच कुमारी, पाच सुवासिनी,पाच ब्राह्मण यांना दक्षिणा, कपडे त्यानंतर भोजन देऊन या व्रताची सांगता तुम्ही करावी. असं सर्व तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. म्हणून तुम्हाला सुख, समृद्धी, धन हे सर्व प्रदान करेल, असंही श्रीराम धानोरकर सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





