मकर संक्रांती 2024 पूजा साहित्य -
1. लाल कपडे, लाल फुले आणि फळे
2. गूळ आणि काळे तीळ
3. तांब्याचे भांडे
4. धूप, दिवा, सुगंधी अत्तर, कापूर, नैवेद्य, लाल चंदन इ.
5. सूर्य चालीसा, आदित्य हृदय स्तोत्र आणि सूर्य आरतीचे पुस्तक
6. गहू किंवा सप्तधान्य, गाईचे तूप.
7. दानासाठी उबदार कपडे, ब्लँकेट, धान्य, खिचडी इ.
advertisement
मकर संक्रांती 2024 पूजा मंत्र -
1. ओम ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते,
अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।
2. ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः।
घरात ताण-तणाव, एकमेकांच सारखं बिनसतंय? वास्तुच्या 4 टिप्स परिणाम करतील
मकर संक्रांती 2024 स्नान पद्धत -
मकर संक्रांतीच्या दिवशी शक्य असल्यास गंगा नदीत स्नान करावे. शक्य नसेल तर ब्रह्म मुहूर्तावर घरी स्नान करावे. अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल घालून आंघोळ करावी. या पद्धतीने स्नान केल्यानं पुण्य लाभ होईल. गंगा मातेच्या कृपेने तुमची पापे नष्ट होतील आणि तुम्हाला शाश्वत पुण्य प्राप्त होईल.
मकर संक्रांती 2024 पूजा पद्धत -
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करावे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवून तृप्त करावे. पाण्याने भरलेले भांडे घ्यावे. त्यात लाल चंदन, लाल फुले आणि गूळ घालून सूर्यमंत्राचा जप करत भगवान भास्कराला अर्घ्य अर्पण करावे.
यानंतर तुम्ही सूर्य चालीसा, आदित्य हृदय स्तोत्र वाचा. त्यानंतर कापूर किंवा तुपाच्या दिव्याने सूर्य आरती करावी. त्यानंतर कुंडलीतील सूर्य देव आणि इतर ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी दान करावे. तीळ, गूळ, गहू, सप्तधान्य, घोंगडी, उबदार कपडे, खिचडी, उडीद डाळ इत्यादी गरजू लोक किंवा गरीब ब्राह्मणाला दान करा. दक्षिणाही देऊ शकता.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
