Vastu Tips: घरात ताण-तणाव, एकमेकांच सारखं बिनसतंय? वास्तुच्या 4 टिप्स परिणाम करतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास बनवते. माणसाच्या वागण्यात कटुता आणते. यामुळे लोक नेहमी निराश आणि थकल्यासारखे वाटू लागतात. अशा परिस्थितीत आपण...
मुंबई, 12 जानेवारी : आजकाल धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला घरामध्ये शांती, सुख-समाधान हवं असतं. पण, ते मिळणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. घरात आनंदी, सकारात्मक राहण्यासाठी सर्वजणच सर्वतोपरी प्रयत्न करतात. अनेक कुटुंबात सतत वाद-विवादाची परिस्थिती निर्माण होत असेत. घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास बनवते. माणसाच्या वागण्यात कटुता आणते. यामुळे लोक नेहमी निराश आणि थकल्यासारखे वाटू लागतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या घरातून नकारात्मक आणि वाईट ऊर्जा काढून टाकणे आवश्यक आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही उपाय ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत.
- सूर्यप्रकाश आणि ताजी हवा
वास्तुशास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त काळोख नसावा, हे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून नैसर्गिक प्रकाश आणि हवा घरात प्रवेश करू शकतात. घरातील विषारी पदार्थ आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खिडक्या उघड्या ठेवणे. घर सकारात्मक राहण्यासाठी घरात ताजी हवा येणं फार महत्त्वाचे आहे. नैसर्गिक सूर्यप्रकाशामुळे उत्साह राहतो आणि घरातील लोकांचा मूडही सुधारतो, असे मानले जाते.
advertisement
- खराब/भंगार सामान
वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या जुन्या तुटलेल्या वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात, विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तू. अशा परिस्थितीत, जर तुमच्या घरात फर्निचर, घड्याळे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारख्या तुटलेल्या वस्तू असतील तर लगेच ते सामान भंगारात घालून टाका. काही वस्तू वापरण्यास योग्य असल्यास त्या दुरुस्त करा आणि नीट करून घरी ठेवा.
advertisement
- घरातील वस्तू व्यवस्थित ठेवा
घरातील वस्तू इकडे-तिकडे विखुरलेल्या असणं, नीटनेटक्या न ठेवणं, यामुळे घरातील लोकांच्या वागण्यात चिडचिड आणि नकारात्मकता निर्माण होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. त्यामुळे घरातील वातावरणात तणाव निर्माण होतो आणि सकारात्मकता निघून जाते. यासाठी आपण आपल्या घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकणे आणि व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही वापरत नसलेल्या गोष्टी गरजूंना दान करा. याशिवाय तुमची खोलीही स्वच्छ ठेवा, असं केल्यानं घरात सकारात्मकतेचे वातावरण राहते.
advertisement
- मीठ वापरा
वास्तुशास्त्रानुसार, मीठ हा घरामध्ये वापरण्यात येणारा एक असा घटक आहे, ज्यात नकारात्मक ऊर्जा काढण्याचा गुणधर्म असतो. फरशी पुसताना पाण्यात समुद्री मीठ मिसळले तर ते तुमच्या घराचे वातावरण सकारात्मक बनवू शकते. हा उपाय गुरुवारी करू नये. याशिवाय काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. जर तुमच्या घराच्या बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे एखाद्या भांड्यात मीठ टाकून ठेवा, असें केल्यानं घरातील वास्तुदोषही दूर होतो, असे मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2024 3:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: घरात ताण-तणाव, एकमेकांच सारखं बिनसतंय? वास्तुच्या 4 टिप्स परिणाम करतील


