Makar Sankranti 2024: संक्रातीच्या महा पुण्यकाळात करावीत ही 3 कामं; सूर्य-शनिची एकत्रित मिळेल कृपा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Makar Sankranti 2024 astrology tips: मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 07:15 ते 09:00 पर्यंत असेल. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून ते सकाळी 09:00 या दरम्यान काही सोपे उपाय अवश्य करावेत, ज्यामुळे आपल्याला सूर्यदेवाची कृपा मिळू शकेल आणि घर ऐश्वर्याने भरून जाईल.
मुंबई, 12 जानेवारी : यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला आहे. त्या दिवशी रवि योग सकाळी 07:15 ते 08:07 पर्यंत आहे. रवि योगामध्ये सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो, दोष दूर होऊन कार्यात यश मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव पहाटे 02:54 वाजता मकर राशीत प्रवेश करतील. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 07:15 ते 09:00 पर्यंत असेल. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून ते सकाळी 09:00 या दरम्यान काही सोपे उपाय अवश्य करावेत, ज्यामुळे आपल्याला सूर्यदेवाची कृपा मिळू शकेल आणि घर ऐश्वर्याने भरून जाईल. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून याबद्दल जाणून घेऊया.
मकर संक्रांती 2024: 3 सोप्या उपायांनी नशीब उजळेल
1. स्नान आणि सूर्य अर्घ्य -
15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सर्वप्रथम स्नान करावे. गंगेत स्नान केले तर खूप चांगले होईल. शक्य नसेल तर घरात अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
advertisement
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे पाण्याने भरावे. नंतर त्यात लाल चंदन, गूळ आणि लाल जास्वंदीचे फूल किंवा कोणतेही लाल रंगाचे फूल टाका. त्यानंतर सूर्यदेवाच्या कोणत्याही एका मंत्राचा उच्चार करत अर्घ्य द्यावे. मकर संक्रांती व्यतिरिक्त तुम्ही दररोज सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतील आणि आपली करिअरमध्ये प्रगती होईल.
advertisement
2. सूर्य स्तुती -
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्याचा स्तुती पाठ म्हणावा. त्याच्या कृपेने जीवनातील दु:ख दूर होतील. आरोग्य चांगले राहील आणि तुमच्या घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता भासणार नाही.
सूर्य स्तुती पठण -
जय कश्यप नंदन, ओम जय अदिति नंदन।।
advertisement
त्रिभुवन तिमिर निकंदन, भक्त हृदय चंदन॥
जय कश्यप नंदन…
सप्त अश्वरथ राजित, एक चक्रधारी।
दु:खहारी, सुखकारी, मानस मल हारी॥
जय कश्यप नंदन…
सुर मुनि भूसुर वंदित, विमल विभवशाली।
अघ-दल-दलन दिवाकर, दिव्य किरण माली॥
जय कश्यप नंदन…
सकल सुकर्म प्रसविता, सविता शुभकारी।
विश्व-विलोचन मोचन, भवबंधन भारी॥
जय कश्यप नंदन…
कमल समूह विकासक, नाशक त्रय तापा।
advertisement
सेवत साहज हरत अति मनसिज-संतापा॥
जय कश्यप नंदन…
नेत्र व्याधि हर सुरवर, भू पीड़ा हारी।
वृष्टि विमोचन संतत, परहित व्रतधारी॥
जय कश्यप नंदन…
सूर्यदेव करुणाकर, अब करुणा कीजै।
हर अज्ञान मोह सब, तत्त्वज्ञान दीजै॥
जय कश्यप नंदन…
3. मकर संक्रांतीला दान करा -
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजा केल्यानंतर काळे तीळ, गूळ, गहू किंवा सप्तधान्य, उबदार कपडे, चादरी, तूप, तांब्याची भांडी किंवा तांबे, सोने इत्यादी पैकी काही दान करावे. काळे तीळ दान केल्यानं तुम्हाला सूर्य आणि शनि या दोघांचाही आशीर्वाद मिळेल, कारण मकर राशी हे शनिदेवाचे घर मानले जाते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव तेथे उपस्थित असणार आहेत.
advertisement
मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाने सूर्यदेवाला काळे तीळ दिले होते, यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनिचे घर धन-धान्य-संपत्तीने भरले. मकर संक्रांतीच्या दिवशी दान कर्म केल्यानं कुंडलीतील सूर्यदोष दूर होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2024 8:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2024: संक्रातीच्या महा पुण्यकाळात करावीत ही 3 कामं; सूर्य-शनिची एकत्रित मिळेल कृपा


