नर्मदापुरम : कुंडलीत कालसर्प दोष असणं म्हणजे आयुष्यात अडचणींमागून अडचणी येणं. हा दोष अत्यंत विनाशकारक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो.
ज्योतिषी पंकज पाठक सांगतात की, कालसर्प दोषामुळे आपल्या मागे अनेक अडचणी लागतात. आयुष्यात अडचणींमागून अडचणी येतात. हा दोष टाळण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी जाणून घेऊया त्याची लक्षणं आणि त्यावरील उपाय.
advertisement
राग आल्यावर अजिबात BP वाढवू नका, एकदा 'हे' 3 उपाय करा
कधी निर्माण होतो कालसर्प दोष?
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू ग्रहांचा प्रभाव वाढतो तेव्हा कालसर्प दोष निर्माण होतो. त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही रामबाण उपाय सांगितलेले आहेत.
जेव्हा सूर्य बदलेल रास, तेव्हा उजळून निघेल नशीब; 5 राशींवर विशेष कृपा
कालसर्प दोषावर उपाय काय?
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल, तिने दररोज किमान 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शिवाय हनुमान चालिसेचं पठणही या दोषावर प्रभावी ठरतं. दररोज 11 वेळा हनुमान चालिसेचं पठण करावं. घरात मोरपिसं ठेवावी. दररोज कुलदेवतेची पूजा करावी. शिवलिंगावर जल अर्पण करावं.
कालसर्प दोषाची लक्षणं काय?
शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात, झोपेत अंगावर साप रेंगाळताना दिसतात, शिवाय स्वप्नात साप चावत असेल तर सावध राहावं. तसंच ती व्यक्ती सतत मानसिक आणि शारीरिक समस्यांशी झगडत असेल, तिला डोकेदुखी, त्वचारोग होत असतील, तर त्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असू शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
