राग आल्यावर अजिबात BP वाढवू नका, एकदा 'हे' 3 उपाय करा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सतत चीडचीड झाल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही त्रास होतो. शिवाय आपली कामंसुद्धा सुरळीत पार पडत नाहीत.
शुभम मारमत, प्रतिनिधी
उज्जैन :आजकालच्या स्पर्धात्मक जगात सर्वात आव्हानात्मक असतं ते स्वतःची काळजी घेणं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शरीर सुदृढ ठेवणं प्रचंड अवघड आहे. कारण सध्या आपल्या कामाचा व्याप इतका असतो की, वेळच्या वेळी जेवायला आणि झोपायलाही आपल्याकडे वेळ नसतो. त्यातून निर्माण होतो ताण आणि त्यातून होते चीडचीड.
आपण विनाकारण एका गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टीवर काढतो. सतत चीडचीड झाल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनाही त्रास होतो, शिवाय आपली कामंसुद्धा सुरळीत पार पडत नाहीत. परंतु तुम्हाला माहितीये का, आपला स्वभाव हा आपल्या कुंडलीतल्या ग्रह, ताऱ्यांशी संबंधित असतो. आपल्या रागाचा संबंधही कुंडलीशी असतो. याबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगतं, पाहूया.
advertisement
नेमका का येतो राग?
ज्योतिषशास्त्रात मंगळ, सूर्य, शनी, राहू आणि चंद्र या ग्रहांचा रागाचं मूळ कारण म्हणून उल्लेख आहे. असं म्हणतात की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य, चंद्र आणि मंगळ ग्रहाचं एकमेकांशी नातं निर्माण होतं, त्या व्यक्तीला प्रचंड राग येतो. जेव्हा ग्रह एकमेकांशी जुळतात तेव्हा त्या व्यक्तीला प्रत्येक मुद्द्यावरून राग येतो. ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष असतो, त्यांना तर राग अनावर होतो.
advertisement
राग शांत करण्यासाठी नेमका उपाय काय?
चांदी : या धातूचा संबंध चंद्राची आहे. कुंडलीत चंद्राचं स्थान कमकुवत असेल किंवा चंद्रदोष असेल, तर व्यक्तीची चीडचीड होते. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांदीची अंगठी वापरावी किंवा गळ्यात चांदीचं पेंडंट घालावं.
सूर्य : दररोज सकाळी आंघोळीनंतर सूर्याला जल अर्पण करावं. सोबतच महादेवांची पूजा करावी. त्यामुळे मन शांत राहतं आणि रागावर नियंत्रण मिळतं. शिवाय हनुमान चालिसेचं पठण करावं. त्यामुळे मंगळ ग्रह शांत होतो.
advertisement
चंदन : चंदनात शांत आणि आरामदायी गुणधर्म असतात. आयुर्वेदात आणि धार्मिक शास्त्रात चंदनाचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत. खूप राग येत असेल तर चंदनाचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी दररोज कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. त्यामुळे मन शांत राहतं आणि राहू दोषांपासून मुक्ती मिळते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
March 07, 2024 4:20 PM IST


