महाशिवरात्री नेमकी कधी आहे? 8 की 9...ज्योतिषांनी सांगितला शुभ मुहूर्त
- Published by:Isha Jagtap
 - local18
 
Last Updated:
महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची आणि व्रत पाळण्याची परंपरा आहे. महाशिवरात्री हा सण का साजरा केला जातो हे कदाचित अनेकांना माहिती नसेल.
जितेंद्र बेनिवाल, प्रतिनिधी
फरीदाबाद : वर्षात एकूण 12 शिवरात्री असतात, महाशिवरात्री मात्र वर्षातून एकदाच साजरी केली जाते. यादिवशी महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा 08 मार्चला महाशिवरात्री साजरी होणार, असं कॅलेंडरमध्ये तरी दिलेलं आहे, परंतु तरीही शुभ मुहूर्ताबाबत संभ्रम आहे.
advertisement
महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करण्याची आणि व्रत पाळण्याची परंपरा आहे. महाशिवरात्री हा सण का साजरा केला जातो हे कदाचित अनेकांना माहिती नसेल. तसंच महाशिवरात्रीला पूजा कशी करावी, हेसुद्धा पाहूया.
ज्योतिषी सीताराम सांगतात की, पौराणिक कथेनुसार महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता. म्हणूनच दरवर्षी हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिव मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. या दिवशी विशेष व्रत पाळलं जातं. असं म्हणतात की, या दिवशी विधीवत पूजा केल्यास आणि व्रत पाळल्यास वैवाहिक जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्ती मिळते. तसंच वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते.
advertisement
महाशिवरात्रीचा सण
ज्योतिषी सीताराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीसाठी शुभ मुहूर्त आहे 8 मार्च रोजी रात्री 09.57 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च रोजी संध्याकाळी 06.17 वाजेपर्यंत. म्हणजेच 8 मार्च रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होईल. या दिवशी दान केल्याने विशेष लाभ होतो. पांढऱ्या वस्तूंचं दान केल्यास दाम्पत्य जीवनात सुख येतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Faridabad,Haryana
First Published :
March 07, 2024 2:49 PM IST


