शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचे दर्शन -
शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली, अशी पौराणिक मान्यता आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो. जर तुम्हालाही शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
advertisement
तुमच्या मृत्यू कसा होईल हे तुमच्या तळहाताच्या रेषेवरून समजेल, असे मिळतील संकेत
- हिंदू धर्मात पूजेमध्ये खाऊची पानं सर्रास वापरली जातात. शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये खाऊच्या पानांचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीला मातेला ही पानं अर्पण केल्यानं तिचा विशेष आशीर्वाद मिळतो. तसेच सुंगधी-मसाले पान देवी लक्ष्मीला अर्पण करू शकता आणि नंतर कुटुंबातील लोकांनी ते प्रसाद म्हणून खावं.
- शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर लक्ष्मी स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी भगवान इंद्राने लक्ष्मी स्तोत्राचा पाठ केला, असे मानले जाते. लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने अपार संपत्ती आणि समृद्धी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
आपण केलेल्या श्राद्ध-पिंडदानाने पूर्वज तृप्त झाले? या काही संकेतातून ओळखू शकता
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)