Pitru Paksha 2023: आपण केलेल्या श्राद्ध-पिंडदानाने पूर्वज तृप्त झाले का? या काही संकेतातून ओळखू शकता

Last Updated:
Pitru Paksha 2023: दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष 16 दिवसांचा असतो, ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या काळात दान-धर्म, ब्राह्मणांना अन्नदान या गोष्टींना अत्यंत महत्त्व असते. पितृ पक्षात आपल्या घरातील दिवंगत लोकांसाठी ब्राह्मणांना अन्न वाढण्याची प्रथा आहे. पूर्वजांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करून गरजूंना दान केल्या जातात. पितृपक्षात आपण केलेल्या श्राद्धाने आपले पूर्वज तृप्त झाले आहेत, की नाही हे कसे ओळखायचे, याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्रकुमार शर्मा माहिती देत आहेत.
1/5
पहिला संकेत -पूर्वजांसाठी केलेले श्राद्ध त्यांनी स्वीकारले असून ते तृप्त झाले असल्याचा पहिला संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येणे. तर पूर्वज तुमच्यावर नाराज असतील तर तुमच्या जीवनातून सुख आणि शांती हिरावून घेतली जाते, तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ लागतात.

advertisement
2/5
दुसरा संकेत -पूर्वज आनंदी असल्याचे आणखी एक संकेत म्हणजे अचानक धन लाभ होणे, दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होणे.
दुसरा संकेत -पूर्वज आनंदी असल्याचे आणखी एक संकेत म्हणजे अचानक धन लाभ होणे, दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होणे.
advertisement
3/5
तिसरा संकेत -पूर्वज आपल्यावर समाधानी असण्याचे तिसरे लक्षण म्हणजे घराच्या छतावर जर कावळा चोचीत गवताची काढी, पेंढा घेऊन आल्याचे दिसणे. या संकेताचा असाही अर्थ आहे की, तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत.

4/5
चौथा संकेत -पूर्वज समाधानी असण्याचे चौथे लक्षण म्हणजे जर कावळ्याने तुमच्याकडून दिलेले अन्न (नैवेद्य) स्वीकारला तर पूर्वज प्रसन्न झाले आहेत, असे मानले जाते. याशिवाय गाय आणि कावळे एकत्र दिसले तर पूर्वज तृप्त झाले आहेत, असे मानले जाते.

5/5
पाचवा संकेत -असे मानले जाते की, पूर्वज तृप्त असतील तर स्वप्नात आपल्या ते हसताना आणि आनंदी अवस्थेत दिसतात. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढते आणि जीवनात शांती नांदते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
पाचवा संकेत -असे मानले जाते की, पूर्वज तृप्त असतील तर स्वप्नात आपल्या ते हसताना आणि आनंदी अवस्थेत दिसतात. यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी वाढते आणि जीवनात शांती नांदते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement