भिंतींवरील डाग - वास्तुशास्त्रानुसार घर किंवा दुकानाच्या भिंतींवरील अस्वच्छता नकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करते. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की, जिथं घाण, डाग आणि अव्यवस्था असते, तिथं देवी लक्ष्मीचा वास कदापि नसतो. त्यामुळे, भिंतींच्या साफसफाईकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, खासकरून उत्तर किंवा ईशान्य दिशेच्या भिंती पूर्णपणे स्वच्छ ठेवाव्यात. ही दिशा कुबेर आणि विष्णूशी संबंधित मानली जाते. जर भिंतींना तडे किंवा ओलसरपणा दिसला तर लगेच दुरुस्ती करून घ्या. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या भिंतींना रंग देताना चमकदार आणि फिक्या रंगांचा वापर केल्यास धनाची स्थिरता वाढण्यास मदत होते.
advertisement
कोळ्यांची जाळी - घरात काही ठिकाणी किंवा कोपऱ्यांमध्ये कोळ्याची जाळी तयार होतात, पण वास्तु आणि धार्मिकदृष्ट्या त्यामुळे धन आणि मिळणाऱ्या संधींमध्ये अडचणी निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार कोळ्याची जाळी घरातील सकारात्मक ऊर्जेला खोडा घालतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा कोपरे, छत आणि फर्निचरच्या मागील जागांची साफसफाई नक्की करा. शक्य असल्यास, साफसफाईनंतर कापूर जाळावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.
शास्त्रशुद्ध दिवाळीतील लक्ष्मी-कुबेरपूजन! मुहूर्त-विधी जाणून घ्या
झाडांची सुकलेली पाने - वास्तुशास्त्रानुसार झाडांची सुकलेली पाने आळशीपणाचे संकेत आहेत. धर्मग्रंथांमध्येही सांगितले आहे की, सुकलेली किंवा कोमेजलेली झाडे नकारात्मक ऊर्जा आणतात. त्यामुळे दररोज तुमच्या दारा- घरातील रोपांची काळजी घ्या, सुकलेली पाने किंवा तुटलेली देठं लगेच काढून टाका. घरात तुळस, मनी प्लांट किंवा बांबूची झाडे लावा. ही रोपे प्रगतीचे मार्ग उघडतात असे मानले जाते. कोमेजलेली तुळस कधीही घराच्या अंगणात ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
वटवाघूळ - वटवाघूळ हा अंधारात आणि घाणीत राहणारा प्राणी आहे. वास्तुशास्त्रानुसार जिथे वटवाघूळ राहतात, तिथं नकारात्मक ऊर्जा वाढते. ज्या घरात किंवा दुकानात वटवाघूळ राहतात, तिथे देवी लक्ष्मी येत नाही, असं मानलं जातं. ज्या ठिकाणी ते येतात, अशा जागांची त्वरित साफसफाई करून घ्या. साफसफाईनंतर दररोज सकाळी गायत्री मंत्र किंवा श्री सूक्तचे पठण करा, यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.
धनत्रयोदशी व्यतिरिक्त या 7 प्रसंगी घरासाठी झाडू खरेदी करणं शुभफळदायी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)