advertisement

Lakshmi-Kubera Pujan: शास्त्रशुद्ध दिवाळीतील लक्ष्मी-कुबेरपूजन! मुहूर्त-विधी जाणून घ्या

Last Updated:

Lakshmi-Kubera Pujan: दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुस-यादिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिले आहे.

News18
News18
मुंबई : दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे लक्ष्मीपूजन. महाराष्ट्रात घरोघरी लक्ष्मीपूजन केलं जातं. आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याचा प्रथा आहे. प्रदोषकाल म्हणजे रात्रीमानाचे पाच भाग करायचे त्यातील सूर्य मावळल्यापासूनचा पहिला भागाला प्रदोषकाल म्हणतात. प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेर पूजन करावयाचे आहे. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून ईश्वरपूजा करावयाची आहे. तसेच प्रदोषकाली लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे असते. याबाबत ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
advertisement
दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुस-यादिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिले आहे. १९६२, १९६३ आणि २॥१३ मध्येही दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुस-या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले होते. प्रदोष कालात आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा असली तरी ती घ्यावी.
advertisement
आश्विन अमावास्येच्या दिवशी प्रदोषकाली भगवान विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले. म्हणून आपण या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन करीत असतो. लक्ष्मी-कुबेर पूजन कसे करायचे ते पाहुया.
एका चौरंगावर स्वस्तिक काढावे. त्यावर कलश ठेवावा. कलशावर ताम्हन ठेवून त्यात. लक्ष्मीची व कुबेराची प्रतिमा ठेवावी. तसेच नवीन वर्षाच्या हिशेब लिहीण्याच्या वह्या आणि लेखन साहित्य ठेवावे.. जवळच दिवा लावून ठेवावा. स्नान करून पूजेचा संकल्प करावा. नंतर श्रीसूक्त म्हणत ल्क्ष्मी-कुबेर, हिशेबाच्या वह्या यांची षोडशोपचारे पूजा करावी. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे व चवळीच्या शेंगा लक्ष्मीला वाहाव्या. गाईच्या दुधात वेलची, लवंग व साखर घालून त्याचा आणि लाडवाचा नैवेद्य दाखवावा. नंतर पुष्पांजली अर्पण करून लक्ष्मीची प्रार्थना म्हणावी.
advertisement
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरे: प्रिया ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात् ॥
“ ( हे लक्ष्मी , ) तू सर्व देवांना वर देणारी आणि श्रीविष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो. “
त्यानंतर कुबेराची प्रार्थना म्हणावी. —
advertisement
धनदाय नमस्तुंभ्यं निधिपद्माधिपाय च ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पद: ॥
निधी आणि पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला नमस्कार असो. तुझ्या कृपेने ( मला ) धनधान्यादी संपत्ती प्राप्त होवो. “
पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधू लागते. जिथे स्वच्छता, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असेल तेथे ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान , कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ , संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
advertisement
केवळ पैसा किंवा संपत्ती म्हणजे लक्ष्मी नव्हे ! चांगल्या मार्गाने मिळविलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होण्यार्या पैशाला ‘ लक्ष्मी ‘ म्हणतात. भ्रष्टाचाराने, अनीतीने व लबाडीने मिळविलेल्या पैशाला ‘लक्ष्मी ‘ म्हणत नाहीत. लक्ष्मी ही विष्णुपत्नी , देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले त्यालेळी लक्ष्मी सागरातून बाहेर आली. लक्ष्मी हा शब्द ‘ चिन्ह ‘ यावरून बनलेला आहे. ‘ श्री ‘ म्हणजे लक्ष्मी ! श्री हे अक्षर स्वस्तिकापासून बनले आहे. लक्ष्मीचे लक्ष्म म्हणजे चिन्ह हे ‘स्वस्तिक‘ आहे. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी ठरल्यामुळे तिची (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी आणि (८) राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे कल्पिलेली आहेत. लक्ष्मीचे ‘बल‘ आणि ‘उन्माद‘ असे दोन पुत्र असल्याचे सांगितलेले आहेत. मात्र, हे भावात्मक पुत्र असावेत. कारण ज्याच्याकडे लक्ष्मी येते तो बलवान असतो, कधी कधी त्याला उन्मादही असू शकतो. श्रीसूक्तात मात्र लक्ष्मीच्या चार पुत्रांची आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लित अशी नावे सांगितलेली आहेत.
advertisement
लक्ष्मीबरोबर कुबेराचीही पूजा केली जाते. कारण कुबेर हा संपत्तीचा रक्षक मानला जातो. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य, त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे रामायणात सांगण्यात आले आहे. म्हणुनच कुबेराला ‘ वैश्रवण ‘ हे नाव प्राप्त झाले. कुबेराच्या आईचे नाव ‘ इडविडा ‘ तपश्चर्या करून कुबेराने ब्रह्मदेवाला संतुष्ट केले. त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वसंरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर त्याने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्णमंडित अशा लंकेवर अधिकार मिळविला. कुबेर लंकेवर राज्य करू लागला.
महाभारतात कुबेराचा उल्लेख पुलस्त्याचा पुत्र असा केलेला असून जन्मत:च ब्रह्मदेवांने त्याला संपत्तीचा व लंकेचा स्वामी नेमले असे म्हटले आहे. रावणाने कुबेराची सारी संपत्ती व पुष्पक विमान पळवून नेल्यावर कुबेर गंधमादन पर्वतावर राहू लागला. हिमालयातील अलका ही कुबेराची नगरी होती. भागवत पुराणात त्या उपवनाचे , राजवाड्याचे वर्णन केलेले आहे. कुबेराचा हा राजवाडा विश्वकर्मा याने बांधला असा उल्लेख सापडतो. कौवेरी ही कुबेराची पत्नी होती. मणिग्रीव, नलकूवर हे त्याचे पुत्र व मीनाक्षी ही त्याची कन्या असल्याचे सांगण्यात आले आहे. कुबेराच्या वाहनांबद्दल मात्र वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळी मते मांडण्यात आली आहेत. कुबेर हा संपत्तीचा स्वामी होता , रक्षक होता आणि म्हणूनच लक्ष्मीबरोबर त्याचीही पूजा केली जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Lakshmi-Kubera Pujan: शास्त्रशुद्ध दिवाळीतील लक्ष्मी-कुबेरपूजन! मुहूर्त-विधी जाणून घ्या
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement