माघ पौर्णिमा 2026: तिथी आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, माघ महिन्याची पौर्णिमा तिथी 1 फेब्रुवारी 2026 रोजी येत आहे. स्नानासाठी आणि दानासाठी काही मुहूर्त अत्यंत शुभ आहेत पौर्णिमा तिथी जी 31 जानेवारी 2026, रात्री 10:25 वाजता सुरु होणार आहे. तर पौर्णिमा तिथी समाप्ती म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026, रात्री 09:40 वाजता जेव्हा पूर्णिमा संपत आहे. उदयातिथीनुसार स्नानाचा मुहूर्त 1 फेब्रुवारी 2026, सकाळी 05:20 ते 06:30 हा ब्रह्म मुहूर्त मानला जात आहे. तर तुमच्याकडुन हा मुहूर्त चुकला तर तुम्ही अभिजित मुहूर्तावर म्हणजेच दुपारी 12:13 ते 12:58 पर्यंत, यावेळेत स्नान करू शकता.
advertisement
या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व
शास्त्रानुसार, माघ पौर्णिमेला 'माघी पौर्णिमा' असेही म्हणतात. या दिवशी स्नान-दानाचे महत्त्व सांगताना पुराणात म्हटले आहे की, "माघे निमग्ना: सलिले सुशीते विमुक्तपापास्त्रिदिवं प्रयान्ति". म्हणजेच माघ महिन्याच्या थंडीत पवित्र नद्यांमध्ये स्नान करणारे लोक पापांतून मुक्त होऊन स्वर्गलोकात स्थान मिळवतात.
या दिवशी स्नान करण्याचे 3 मुख्य फायदे आहेत
माघ पौर्णिमेला स्नान केल्याने सात जन्मांच्या कळत-नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून देव पृथ्वीवर येतात आणि मानवी रूपात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. त्यामुळे या दिवशी गंगास्नान केल्याने ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे किंवा मानसिक अस्वस्थता आहे, त्यांना या दिवशी चंद्राच्या प्रकाशात बसून ध्यान केल्याने आणि स्नान केल्याने शांती मिळते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
