कोणत्याही महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्येही प्रगती होते. जीवनात अनेक समस्या वाढल्या असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने शुभ फळ मिळते.
संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त -
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होईल आणि गुरुवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:02 वाजता समाप्त होईल. निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे 18 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत साजरे करण्यात येणार आहे.
advertisement
ब्रह्म मुहूर्त- पहाटे 5.19 ते 06.40
विजय मुहूर्त - दुपारी 2:01 ते 2:42 पर्यंत
संध्याकाळची शुभ वेळ - 5:25 ते 5:52 पर्यंत
अमृतकाल- सकाळी 06:30 ते 08:07
ग्रहांचा राजकुमार नशीबाचं चक्र फिरवणार! नववर्षाआधीपासून या राशी जोमात, धनलाभ
संकष्ट चतुर्थी पूजा विधी -
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. मूर्तीला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा.
कुंकू, हळद-चंदन, माळा, फुलांनी सजवा.
तुपाचा दिवा लावून मोदक व नैवेद्य अर्पण करावेत.
ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा आणि श्रीगणेशाची आरती करा.
संकष्ट चतुर्थीचे महत्त्व - श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. श्री गणेशाला विघ्नहर्ता असे म्हणतात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत पाळल्याने घरात सुख-समृद्धी येते. आर्थिक लाभामुळे व्यवसाय वाढेल. श्रीगणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात.
घरचे अरेंज्ड बघत राहतात! पण या जन्मतारखांचे लोक लव्ह मॅरेज करून येतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)