मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल?
वैदिक पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही तिथी 7 मे रोजी सकाळी 10:19 वाजता सुरू होईल आणि 8 मे रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, मोहिनी एकादशीचा उपवास 8 मे रोजी केला जाईल.
मोहिनी एकादशी पूजा विधी
advertisement
मोहिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा आणि स्नान करा. स्नान केल्यावर पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करा. देवाला पिवळी फुलं अर्पण करा आणि धूप, दीप आणि नैवेद्य दाखवा. भगवान विष्णूची आरती करा. या दिवशी गरीब लोकांना भोजन देण्याचंही विशेष महत्त्व आहे.
मोहिनी एकादशीचे महत्त्व
उज्जैनचे ज्योतिषी आनंद भारद्वाज यांनी सांगितलं की, या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. पद्म पुराणानुसार, त्रेता युगात भगवान रामाने महर्षि वसिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्त करणारा सर्वोत्तम उपवास आहे.
या मंत्रांचा जप करा
- ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
- ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्
- ॐ ह्रीं श्री लक्ष्मीवासुदेवाय नमः
- शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।
हे ही वाचा : मे महिन्यात उरका लग्न! कारण 'या' तारखांनंतर नाहीत शुभ मुहूर्त, कारण काय?
हे ही वाचा : 'या' दिवशी प्रसन्न होते देवी लक्ष्मी; धरा उपवास अन् करा पूजा, तिजोरी पैशांनी भरून जाईल